बिबट्याच्या दहशतीवर संसदेत चर्चा.. – खा.रवींद्र चव्हाण.

नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये जंगली जनावरांपैकी विशेषतः बिबट्या वाघ या हिंस्र प्राण्यांचा मानवी वस्तीत वावर होत असल्याने शेतकरी,जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या महत्वपूर्ण विषयावर सरकारचे लक्ष वेधून त्यावर चर्चा घडवून आणली.
आमचे आदरणीय बंधूतुल्य सहकारी नांदेडचे खा.रविंद्र वसंतराव चव्हाण यांचे मनापासून अभिनंदन व आभार..
केंद्र सरकारकडून या प्रकरणात तातडीने कार्यवाही व्हावी,हि अपेक्षा
वनसंपदाच नष्ट होत असल्याने वन्यजीवांचा मानवी वस्तीत वावर !
मुख्यत्वे नांदेड जिल्ह्य़ात वन व सामाजिक वनीकरण विभागातील बहुतांश प्रमाणात दर्जाहिन व कागदोपत्री वृक्षलागवड,संगोपन आदी विविध प्रकारची कामे होत असल्याने तसेच,राखीव वनजमिनी व लगतच्या जमिनीतील गौण खनिज उत्खनन,वहातूकीसह अन्य कामे आणि वनजमिनीवरील वाढती अतिक्रमणे इ.बाबींमूळे वनसंपदाच नष्ट होत चालल्यानेच मानवी वस्तीत वन्यजीवांचा वावर वाढल्याचे समजते. वनविभागाचे कार्यरत उपवनसंरक्षक यांच्या कार्यकाळातच हे प्रमाण वाढल्याचे बोलल्या जाते.
याबाबतही उच्चस्तरीय चौकशीसह दोषींवर कारवाई व्हावी.



