सय्यद अबुबकर नोमान यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्यांक विभागात जिल्हा सह-सचिव, नांदेड शहर या पदावर नियुक्ती करण्यात आली

नांदेड | प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्यांक विभागात संघटनात्मक बळकटीसाठी नवी नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेड शहरातील सय्यद अबुबकर नोमान यांची जिल्हा सह-सचिव, नांदेड शहर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष अॅड. जमीर पठाण मालीपटेल यांनी जाहीर केली. नियुक्तीबद्दल नोमान यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत, पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. खा. सुनीलजी तटकरे, अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. मा. सैय्यद जलालुद्दीन, महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक अध्यक्ष मा. अॅड. नाझेर काझी, माजी मंत्री मा. नवाब मलिक, तसेच नांदेड जिल्ह्याचे लोकनेते मा. आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.
शिव–फुले–शाहू–आंबेडकर व मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या विचारांवर आधारित धर्मनिरपेक्ष धोरण पुढे नेत जिल्ह्यात सशक्त व निर्विवाद पक्ष संघटना उभारण्यासाठी श्री. नोमान प्रयत्नशील राहतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या नियुक्तीमुळे नांदेड शहरातील अल्पसंख्यांक विभागाच्या कार्याला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.



