जिला

नांदेड ते निजामबाद दरम्यान पुष पुल रेल्वे सेवा सुरू करा – महाव्यवस्थापकाला मराठी पत्रकार संघाची निवदेन सादर मागणी

 

मुदखेड तालुका प्रतिनिधी मोहम्मद हकीम

नांदेड ते निजामाबाद दरम्यान रेल्वे पुष पुल रेल्वे सेवा सुरु करण्यात यावी या संबंधी आज दिनाक. 05 फेब्रुवारी रोजी दुपारी 03.00 वाजता मुदखेड रेल्वे स्दटेशन येथे दक्षिण मध्य रेल्वे झोन सिकंदराबादचे महाव्यवस्थापक संजय कुमार श्रीवास्तव यांची भेट घेत मुदखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद झोन चे महाव्यवस्थापक संजय कुमार श्रीवास्तव यांचं वार्षिक परीक्षण या हेतूने दक्षिण मध्य रेल्वे झोन मध्ये येणारे सर्व रेल्वे स्थानकांची पाहणी करत सुरू असलेल्या विकास कामांची माहिती घेत आज मुदखेड रेल्वे स्टेशनवर अमृत भारत योजनेत अंतर्गत मुदखेड रेल्वे स्टेशन पुनर्विकास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांची माहिती घेतली यावेळी मराठी तालुका पत्रकार संघाच्या वतीने निवेदन स्वीकारले नांदेड पासून निजामाबाद दरम्यान सकाळी 09.00 नंतर देवगिरी एक्सप्रेस नंतर कोणतीच रेल्वे सेवा नसल्यामुळे या भागातील नागरिकांची खूपच प्रवास करण्यासाठी खूपच दमछाक होते.

त्यांना प्रवास करण्यासाठी एसटी किंवा खाजगी वाहतुकीनेच प्रवास करावा लागतो ती तात्काळ दूर करत नांदेड ते निजामाबाद दरम्यान पुषपुल सेवा रेल्वे सुरू करून होणारी गैरसोय दूर करून नागरिकांना रेल्वेची सेवा उपलब्ध करून द्यावी असे या निवेदनात प्रमुख मागणी केली आहे. याप्रसंगी तालुका अध्यक्ष सिद्धार्थ चौदंते, तालुका कार्याध्यक्ष दिनेश शर्मा, शहराध्यक्ष अतिक अहमद, शेख शमशोद्दीन, आणि मोहम्मद हकीम यांची उपस्थिती होती.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *