जिला

धनगरवाडी येथे जल अर्पण दिवस साजरा…

धनगरवाडी गावात ग्रामस्थांनी उत्साहात साजरा केला जल अर्पण दिवस ...

 

गावातील पाणीपुरवठा योजना निरंतर सुरू ठेवणार ग्रामस्थांचा निर्धार…

नांदेड – गावकऱ्यांच्या सकारात्मक सहकार्याच्या दृष्टिकोनातून जल जीवन मिशनच्या ‘हर घर, नल से जल’ योजनेतून गावातील पाणी पुरवठा योजना यशस्वी करण्यात तरूणाईचा मोठे योगदान आहे. भविष्यात ही योजना दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी वितरण वाहिनी सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने गावकऱ्यांनी पावले उचलली आहेत. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गावातील सर्वांचे योगदान न विसरण्यासारखे आहे. गावात जलजीवन मिशनने उभारलेल्या पाणीपुरवठा ताब्यात घेऊन यशस्वीपणे चालवावी व गावची पाण्याची तहान भागवावी, असे आवाहान कार्यकारी अभियंता राहूल रावसाहेब, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक मयूरकुमार आंदेलवाड यांनी केले आहे.

नांदेड तालुक्यातील धनगरवाडी ग्रामपंचायतमध्ये जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. गावातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे शुद्ध पाणी मिळत आहे, पाणी पुरवठा योजना गावाला हस्तांतरण दिवस, जल अर्पण दिवस आज विविध उपक्रम राबवून ग्रामस्थांनी उत्साहाने साजरा करण्यात आला. गावातील पाणी पुरवठा योजना यापुढेही निरंतर सुरू ठेवू गावाला या पुढे नळाव्दारेच नियमित पाणी पुरवठा सुरू राहिल असे आश्वासन सरपंच अमित संजय पगडे, ग्रामपंचायत आधिकारी रूख्माजी मुदखेडे आणि गावकर्यांनी प्रशासनाला दिले आहे.

जल अर्पण दिनाचे औचित्य साधून सर्वप्रथम सकाळी नागरिकांच्या वतीने धगरवाडी येथे ग्राम सफाई करण्यात आली. त्यानंतर जल अर्पण दिवस कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली, ग्रामपंचायत कार्यालयापासून नळ योजनेच्या पाणी टाकी, गावातील मुख्य रस्त्याने जल रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी, महिला, गावकारी, गावातील शासकीय कर्मचारी यांनी सहभाग घेतला. तर त्यांनी पाणी विषयक घोषवाक्य फलक हातात घेऊन घोषणा दिल्या.

उपअभियंता एस. डी. देशमुख, रॅली दरम्यान ग्राम आरोग्य पोषण आहार पाणीपुरवठा स्वच्छता समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी नागरिकांना नळ पाणीपुरवठा योजनेच्या विविध अपंगाबाबत प्रत्यक्ष स्थळावर माहिती दिली. त्यानंतर नळाच्या पाण्याचे कलश यामध्ये संकलन करण्यात आले. तसेच टाकी परिसरात जल पुजन करण्यात आले. जल संकलित करून जल कलशांची मिरवणूक रॅलीच्या माध्यमातून गावातून काढण्यात आली.

जल अर्पण दिवस निमित्त गावात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, या कार्यक्रमात गावातील पाणी पुरवठा योजनेची संपूर्ण माहिती ग्रामस्थांना देऊन योजना कायमस्वरूपी सुरू ठेवून देखभाल विषयी माहिती देण्यात आली. गावात उत्सव साजरा करताना पाण्याचे महत्व ग्रामस्थांना कळावे यासाठी गावातील महिलांनी जलपूजन केले डोक्यावर सुशोभित हंडे घेऊन शालेय विद्यार्थी व नागरीक समवेत गावातून रॅली काढण्यात आली, यामध्ये गावातील विद्यार्थी, ग्रामपंचायतचे पदाधिकारी व ग्रामस्थ हे सहभागी झाले होते. तसेच शुद्ध पाण्यासाठी (एफ.टी.के.) किटचे प्रात्यक्षिक दाखवून शुद्ध पाण्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. कार्याक्रमात जल प्रतिज्ञा गावकर्यांनी घेतली.

तसेच गावात सदरची योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहूल रावसाहेब, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता मयुरकुमार आंदेलवाड यांच्या उपस्थितीत पाणी पुरवठा योजनेचे कागदपत्र देऊन सदर योजना ग्रामपंचायतीस हस्तातरण समारंभ आज २६ फेब्रुवारी २०२६ रोजी जल अर्पण दिवशी घेण्यात आला. पाणी पुरवठा योजना शाश्वतरीत्या चालवण्यासाठी आणि स्त्रोत शाश्वत ठेवण्यासाठी कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आले. जलसंधारणाच्या कामामधून जल पुनर्भरणावर भर देण्यात यावा, जेणेकरून भविष्यात पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागणार नाही असे आवाहन जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक मयूरकुमार आंदेलवाड यांनी केले आहे.

सदर कार्यक्रमास पोलिस पाटील कृष्णा पगडे, दत्तराम बोभडे, माहिती शिक्षण व संवाद सल्लागार डॉ. नंदलाल लोकडे, पाणी गुणवत्ता समन्वयक कपेंद्र देसाई, मनुष्यबळ विकास समन्वयक कनिष्ठ अभियंता माधुरी शिंदे, पार्थ कुलकर्णी, पायाभुत सुविधा सल्लागार स्वप्निल शैलकर, आरोग्य सहाय्यक एन.यु. राऊत, एम.व्ही. सावंत, सौ. एच.जी. खराते, आजिंक्य जायभाये, दीपक बेराडे, आरोग्य सेविका सौ. एस.टी. जांभळे, सौ. कौश्यल्याबाई साखरे, दिंगाबर काकडे, गोविंद चांदणे, गजानन चांदणे, पार्वती वीर, आशाबाई काळे, निर्मला काकडे, रोहिदास पगडे, गंगाधर काकडे, त्र्यंबक काकडे, बालाजी काकडे, सतीश काकडे, श्याम काकडे गावातील शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *