मराठवाडा

ऑपरेशन जीवन रक्षा” अंतर्गत महिला कॉन्स्टेबल, रेल्वे सुरक्षा दल पूर्णाने वाचवले वृद्ध प्रवाशाचे प्राण

 

रेल्वे सुरक्षा दल (RPF), पूर्णा रेल्वे स्थानक येथे “ऑपरेशन जीवन रक्षा” अंतर्गत 24.02.2026 रोजी एका वृद्ध प्रवाशाचा जीव वाचवून सतर्कता आणि धाडसाचे उत्तम उदाहरण सादर केले. दि. 24 फेब्रुवारी 2026 रोजी सायं. 19.45 वाजता महिला कॉन्स्टेबल सौ. रमा शर्मा (बकल क्रमांक 2337), आरपीएफ पोस्ट पूर्णा, या सकाळ शिफ्टमध्ये कर्तव्य बजावत होत्या. गाडी क्र. 17614 पनवेल एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्र. 02 वर आल्यानंतर त्या संबंधित गाडीत “मेरी सहेली” या कार्यक्रमा अंतर्गत स्थानकावर कर्तव्यात होत्या.

दरम्यान, गाडी सुटत असताना श्री. बाबुराव घाटगे (वय 75 वर्षे) या वृद्ध प्रवाशांनी धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न केला. मात्र तोल जाऊन ते प्लॅटफॉर्म आणि धावत्या गाडीच्या मधील धोकादायक जागेत पडण्याच्या स्थितीत आले, ज्यामुळे जीवितास गंभीर धोका निर्माण झाला. ही परिस्थिती पाहताच सौ. रमा शर्मा यांनी अतुलनीय धैर्य, तत्परता व प्रसंगावधान दाखवत तात्काळ धाव घेतली आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या वृद्ध प्रवाशाला सुरक्षितरित्या बाहेर ओढून त्यांचा जीव वाचवला.

ऑपरेशन “जीवन रक्षा” अंतर्गत केलेल्या या शौर्यपूर्ण कृतीमुळे मोठा अपघात टळला असून आरपीएफच्या सतर्कता, कर्तव्यनिष्ठा व मानवतावादी सेवाभावाचे उत्कृष्ट उदाहरण समोर आले आहे. संबंधित प्रवाशाने व त्यांच्या कुटुंबीयांनी आरपीएफ कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. रेल्वे सुरक्षा दलाकडून सर्व प्रवाशांना पुन्हा एकदा आवाहन करण्यात येते की, धावत्या गाडीत चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नये व स्वतःच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *