लोहा : वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार

लोहा – येथील शासकीय विश्रामगृहात वंचित बहुजन आघाडीच्या विविध पदाधिकाऱ्यांचा लोहा तालुक्याच्या वतीने उत्साहात सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते फारुख अहेमद यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच नांदेड शहर महानगरपालिकेचे वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक तथा गटनेते इंजि. प्रशांत इंगोले, नगरसेवक कुलदीप राक्षेसमारे, दिलीप देशमुख, कैलास वाघमारे, डॉ. संतोष वाठोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त तथा वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ मार्गदर्शक बी. बी. गायसमुद्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात अनिल दादा गायकवाड, श्याम वाघमारे, शेषराव हंकारे, चांदु गायकवाड, आत्माराम गायकवाड, संतोष वाघमारे, गौतम ढगे, संभाजी मस्के, गौतम कांबळे, विशाल गायसमुद्रे आदींची उपस्थिती लाभली.
या सत्कार सोहळ्यात कार्यकर्त्यांनी एकत्र येत संघटन मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. छाया : विनोद महाबळे



