मनोरंजन

मराठी कलाक्षेत्रातील एक महत्त्वाचं पर्व संपलं…..!

नांदेड दि.१३ ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन,वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास मराठी चित्रपटसृष्टी, नाट्यविश्व आणि लोककलेच्या क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं पुण्यातील राहत्या घरी निधन झालं.
त्या ७३ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माळेगाव येथे जन्मलेल्या मधु कांबीकर यांना बालपणापासूनच लोककलेची आवड होती. आपल्या कलेच्या जोरावर त्यांनी मनोरंजनविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

लोककलेपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे नाटक आणि मराठी चित्रपटसृष्टीपर्यंत पोहोचला. चार दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी ७५ हून अधिक चित्रपटांत काम केलं. शापित, एक होता विदूषक, झपाटलेला आणि मुक्ता यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. आपल्या सहजसुंदर अभिनयातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं.२०१६ मध्ये एका कार्यक्रमानंतर त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली होती.

त्यांच्या निधनाने मराठी कलेतील एक महत्त्वाचं पर्व संपलं आहे. त्यांच्या कलेचा ठसा आणि आठवणी मराठी रसिकांच्या मनात कायम जिवंत राहतील.या अस्सखलित सौंदर्यवती ला मराठी चित्रपट सृष्टी म्हणावी तशी न्याय देऊ शकली नाही त्यांच्या नृत्य आणि सहज सुंदर अभिनय गुणांच्या तुलनेत त्यांना म्हणावी तशी प्रसिद्धी आणि सन्मान मिळाला नाही याची सदैव खंत राहील.
*भावपूर्ण श्रद्धांजली……!

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *