जिला

नांदेड एलसीबीला नवे नेतृत्व; अतुल भोसले यांची नियुक्ती, पोलिस दलात खळबळ

 

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्हा पोलीस दलात गुरुवारी रात्री मोठा बदल करत स्थानिक गुन्हा शाखेच्या (एलसीबी) पोलीस निरीक्षकपदी Atul Bhosale यांची नियुक्ती करण्यात आली. पोलीस अधीक्षक Abinash Kumar यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

जवळपास अडीच वर्षे एलसीबीचा कारभार पाहणारे Uday Khanderay यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. अलीकडेच नांदेडमध्ये घडलेल्या सलग खूनप्रकरणांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामुळे पोलीस दलात मोठ्या बदलांची शक्यता व्यक्त होत होती आणि त्याची सुरुवात एलसीबीपासून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

४ एप्रिलपासून सुरू झालेल्या गुन्हेगारी टोळी संघर्षामुळे नांदेड राज्यभर चर्चेत आले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस उपमहानिरीक्षक Shahaji Umap यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली होती. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा बंदोबस्तही यशस्वीरीत्या पार पडला होता.

दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री Atul Save यांच्या अलीकडील दौऱ्यात जिल्हा पोलीस दलाच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला होता. या बैठकीत बिलोलीतील कारवायांची चर्चा रंगली होती. त्याच पार्श्वभूमीवर अतुल भोसले यांचे नाव पुढे आले असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या काही काळात विविध कारवायांमुळे चर्चेत असलेले भोसले यांनी २३ एप्रिलच्या रात्री एलसीबीचा पदभार स्वीकारला. या नियुक्तीमुळे इच्छुक असलेल्या इतर अधिकाऱ्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे.

नवीन जबाबदारी स्वीकारताना भोसले यांच्यासमोर जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी, टोळीयुद्ध, मटका-सट्टा, अवैध क्लब आणि वाळू तस्करीवर आळा घालण्याचे मोठे आव्हान असणार आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी विश्वास दाखवत हा निर्णय घेतला असून, भोसले यांच्या कामगिरीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *