जिला

लोहा येथे अजितदादा पवार जयंतीनिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम

लोहा : राज्याचे उपमुख्यमंत्री Ajit Pawar अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त लोहा नगरपरिषदेच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी उपस्थितांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देत अधिकाधिक वृक्ष लागवडीचे आवाहन केले.

कार्यक्रमास प्रविण पाटील चिखलीकर, सचिन पाटील चिखलीकर, नगराध्यक्ष शरद पाटील पवार, उपनगराध्यक्ष करीमभाई शेख, गटनेते भास्कर पवार, माजी पंचायत समिती सभापती आनंदराव शिंदे, माजी नगराध्यक्ष किरण सावकार वट्टमवार तसेच कंधार नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष मन्नान चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमास नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. छायाचित्र : विनोद महाबळे

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *