नांदेड ऑलिम्पिक असोसिएशनतर्फे क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, खेळाडू आणि शाळांचा होणार सन्मान
राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार’, ‘क्रीडा रत्न जीवन गौरव’ पुरस्कार व ‘बेस्ट फाईव्ह स्कूल’साठी प्रस्ताव सादर करण्याचे आव्हान.

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या आणि विविध क्रीडा प्रकारांच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या ऑलिम्पिक असोसिएशन, नांदेड व फेन्सिंग असोसिएशन नांदेड यांच्या वतीने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळांचा गौरव करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
याअंतर्गत ‘ राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार,क्रीडा रत्न जीवन गौरव पुरस्कार ’ तसेच ‘ बेस्ट फाईव्ह स्कूल’ या विशेष पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
५० वर्षांपासून क्रीडा क्षेत्रासाठी योगदान देणाऱ्यांचा गौरव
नांदेड जिल्ह्यात मागील ५० वर्षांपासून क्रीडा क्षेत्रासाठी सातत्याने कार्यरत असलेले क्रीडा संघटक, प्रशिक्षक, शिक्षक, माजी क्रीडा अधिकारी, माझी जिल्हा क्रीडा अधिकारी खेळाडू तसेच विविध क्रीडा क्षेत्रातील योगदान देणाऱ्या व्यक्तींचा ‘क्रीडा रत्न जीवन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
क्रीडा क्षेत्रासाठी आयुष्यभर योगदान देणाऱ्या या मान्यवरांची माहिती पुढे यावी आणि त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, या उद्देशाने संबंधित व्यक्ती, संस्था व क्रीडा संघटनांनी योग्य प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘जिजाऊ पुरस्कार साठीही प्रस्ताव मागविले
क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे विशेष योगदान देणाऱ्या गुणवंतांचा सन्मान करण्यासाठी ‘ राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार ’ देण्यात येणार आहे. *खेळाडूंची आई यांचा क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्याचा प्रस्ताव या पुरस्कारासाठी सादर करता येणार आहेत.
उत्कृष्ट क्रीडा कार्य करणाऱ्या पाच शाळांची निवड
नांदेड जिल्ह्यातील शाळांमध्ये क्रीडा क्षेत्रासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘बेस्ट फाईव्ह स्कूल’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. शाळांनी मागील तीन वर्षांचा (2023 ते 2025) क्रीडा क्षेत्रातील अहवाल, खेळाडूंची कामगिरी, विविध स्पर्धांमधील सहभाग, मिळविलेले पुरस्कार, क्रीडा सुविधा, प्रशिक्षकांची उपलब्धता आणि शाळेचे क्रीडा क्षेत्रातील एकूण योगदान याची माहिती प्रस्तावासोबत सादर करावी.
उत्कृष्ट काम करणाऱ्या पाच शाळांची निवड करून त्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. सदर पुरस्कार महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव श्री संजय शेटे यांच्या हस्ते दिनांक 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5:00 वा स्थळ नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख — १० ऑक्टोबर २०२६
या सर्व पुरस्कारांसाठी इच्छुक व्यक्ती, क्रीडा संस्था, संघटना, प्रशिक्षक, शाळा आणि संबंधितांनी आपले प्रस्ताव १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन चेअरमन शिवछत्रपती पुरस्कार विजेते जनार्दन गोपीले , कार्याध्यक्ष प्रलोभ कुलकर्णी , अध्यक्ष डॉ . हंसराज वैद्य, उपाध्यक्ष विक्रात खेडकर, बाबुराव खंदारे, डॉ. रमेश नांदेडकर, अजगर अली पटेल, टि एन बैनवाड,, कोषाध्यक्ष प्रा . जयपाल रेड्डी ,सहसचिव डॉ. राहुल वाघमारे, प्रा वृषाली पाटील जोगदंड, डॉ राजेश जांभळे, डॉ दिनकर हंबर्डे, कुलदिपासिंग जट , विनोद जमदाडे, राष्ट्रपाल नरवाडे, बालाजी शिनेवाड, विलास नागेशवर, प्रशांत आसमाने अमोल शेंडगे, संघटना महासचिव बालाजी पाटील जोगदंड याच्या वतिने करण्यात आले आहे.
क्रीडा क्षेत्रातील जास्तीत जास्त गुणवंत व्यक्ती, संस्था आणि शाळांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन ऑलिम्पिक असोसिएशन, नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रस्ताव व अधिक माहितीसाठी संपर्क :
बालाजी पाटील जोगदंड — महासचिव
📞 9420673394
मुख्य आयोजक :
डॉ. राहुल रा. वाघमारे
📞 7020138742
आयोजक : फेंसिंग असोसिएशन नांदेड व ऑलिम्पिक असोसिएशन नांदेड



