स्पोर्ट्स

आंतरशालेय जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत ग्यान माता विद्या विहार शाळेला विजेतेपद

 

नांदेड दि. ५ ऑक्टोबर २०२६ नुकत्याच झालेल्या आंतरशालेय जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत शाळेच्या १४ वर्षा खालील आणि १७ वर्षाखालील मुलांच्या संघाने विजेतेपद पटकावले. या शानदार विजयामुळे दोन्ही संघांची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सांधिक खेळ, जिद्य, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश संपादन केले.

विजयी संघाला क्रिडा शिक्षक श्री. फेलिक्स पिल्ले, श्री. विष्णु शिंदे, श्री. अलेक्स के., सौ. श्वेता ठाकूर, सौ. यदुकृष्णा यांचे मार्गदशन लाभले.

दि. ७/१०/२०२६ ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल निळा रोड, नांदेड येथे होणा-या विभागीय फुटबॉल स्पर्धेसाठी शाळेचे प्राचार्य फादर ईग्नाथी, शाळेचे अधीक्षक फादर आनंद, सिस्टर्स, क्रिडा शिक्षक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शाळेच्या संघाला शुभेच्छा दिल्या.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *