जिला

जागतिक हात धुवा दिनानिमित्त जिल्हाभरात जनजागृती उपक्रम

साबणाने हात धुण्याची सवय अंगीकारा- मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील

 

 

नांदेड,14- जागतिक हात धुवा दिनानिमित्त 15 ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, शाळा, अंगणवाड्या आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हातांच्या स्वच्छतेविषयी विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नागरिकांनी साबणाने हात धुण्याची सवय दैनंदिन जीवनात अंगीकारून स्वतःचे आणि कुटुंबाचे आरोग्य जपावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांनी केले आहे.

साबणाने योग्य पद्धतीने हात धुतल्याने अनेक संसर्गजन्य आजारांचा प्रसार रोखण्यास मदत होते. या दिनानिमित्त शाळा, अंगणवाड्या आणि ग्रामपंचायतींमध्ये हात धुण्याची प्रात्यक्षिके घेऊन स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. जेवणापूर्वी, शौचालयाचा वापर केल्यानंतर तसेच अन्न तयार करण्यापूर्वी साबणाने हात धुणे आवश्यक आहे. लहानपणापासूनच मुलांमध्ये हातांच्या स्वच्छतेची सवय रुजवून ती त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविणे गरजेचे आहे.

या जनजागृती उपक्रमात विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, महिला बचत गट आणि ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा. तालुकास्तरीय अधिकारी आणि संबंधित विभागांनी परस्पर समन्वयातून ही मोहीम प्रभावीपणे राबवून हातांच्या स्वच्छतेचा संदेश जिल्ह्यातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी केले आहे.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *