मराठवाडा

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवारच्या मागणीला यश; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे बॅकलॉग परीक्षेचे शुल्कही माफ!

फैसल सिद्दीकी यांच्या निवेदनाची दखल; स्वा.रा.ती.म. विद्यापीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

 

नांदेड दि. 14 – महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या हिवाळी-2026 परीक्षेचे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, नियमित विद्यार्थ्यांसह बॅकलॉग विद्यार्थ्यांनाही या शुल्कमाफीचा लाभ मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष फैसल सिद्दीकी यांनी यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

दि. 7 ऑक्टोबर 2026 रोजी फैसल सिद्दीकी यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन देऊन दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे बॅकलॉग परीक्षेचे शुल्कही माफ करण्याची मागणी केली होती. शासनाकडून परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय जाहीर झाल्यानंतरही बॅकलॉग परीक्षेच्या शुल्काबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे नियमित विद्यार्थ्यांप्रमाणेच बॅकलॉग विद्यार्थ्यांनाही शुल्कमाफीचा लाभ मिळावा, अशी आग्रही मागणी निवेदनातून करण्यात आली होती.

या मागणीला कुलगुरूंनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर 14 ऑक्टोबर 2026 रोजी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील कुलगुरूंसमवेत झालेल्या ऑनलाइन बैठकीत हिवाळी-2026 परीक्षेसाठी दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क पूर्णतः माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयानुसार विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांतील नियमित तसेच बॅकलॉग विद्यार्थ्यांसह पात्र शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनाही शुल्कमाफीचा लाभ मिळणार आहे. पात्र विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज कोणतेही परीक्षा शुल्क न घेता स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *