शिक्षण

श्री शिवाजी कॉलेज, कंधार यांच्या इतिहास विभागाच्या जगत्तुंग भिंतीपत्रकाचे अनावरण

 

कंधार दि.१४ श्री शिवाजी कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, कंधार यांचा इतिहास विभाग (पदवी,पदव्युत्तर व संशोधन केंद्र) आणि श्री. संत गाडगे महाराज महाविद्यालय,लोहा, ता. लोहा, जि. नांदेड यांच्यात झालेल्या अंतर्गत सामंजस्य (MoU) करारानुसार पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी इतिहास अभ्यास मंडळ उद्घाटन ‘जगत्तुंग’ या भिंती पत्रकाचे अनावरण, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP-2020) नुसार Field Survey साठी क्षेत्रीय कार्य नियोजन समितीच्या फलकाचे अनावरण इ. कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांच्या ऐतिहासिक ज्ञानात भर घालणे, विद्यार्थ्यांची संशोधनवृत्ती विकसित करणे, विद्यार्थ्यांत इतिहास विषयाची गोडी निर्माण करणे, यातून इतिहासाची चर्चा, विचार मंथन व अभ्यास यासाठी विचारपीठ उपलब्ध करून देणे, इतिहास विषयाचा व्यावहारिक अभ्यास करणे हे कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट्ये होते. या कार्यक्रमात इतिहास विभागाद्वारे दरवर्षी प्रकाशित करण्यात येणाऱ्या ‘जगत्तुंग’ या भिंती पत्रकाचे अनावरण झाले. यावर्षीच्या भिंती पत्रकाचा विषय ‘मराठवाड्यातील निवडक किल्ले’ हा होता. यात पदवी व पदव्युत्तर वर्गांच्या इतिहास विषयाच्या विद्यार्थ्यांनी देवगिरी, नंदगिरी, कृष्णदुर्ग, उदगीर, परांडा या प्रमुख समृद्ध दुर्ग वैभवाची माहिती दिली. या भिंतीपत्रकात इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी संशोधन करून माहिती व संदर्भांचा समावेश करत प्रभावी मांडणी केली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP-2020) नुसार Field Survey करण्यासाठी क्षेत्रीय कार्य नियोजन समितीच्या कार्यकारिणी मंडळाची घोषणा करून फलकाचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र. प्राचार्य डॉ. व्ही. टी. ठाकूर हे होते.

प्रमुख पाहुणे प्रा. विकास पेरके (इतिहास विभाग प्रमुख, श्री संत गाडगे महाराज महाविद्यालय, लोहा, ता. लोहा) हे होते. त्यांच्या हस्ते इतिहास अभ्यास मंडळ फलक, क्षेत्रीय कार्य नियोजन समिती व जगत्तुंग या भिंती पत्रकाचे अनावरण करण्यात आले. त्यांनी अभ्यास मंडळाच्या माध्यमातून व्याख्याने, चर्चासत्रे, प्रश्न मंजुषा, ऐतिहासिक दिनांचे आयोजन व विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून इतिहास समजून घेण्याची संधी उपलब्ध होईल. विद्यार्थांनी या क्षेत्रात सक्रिय सहभाग घ्यावा, असे मत मांडले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र. प्राचार्य डॉ. व्ही. टी. ठाकूर यांनी अध्यक्ष समरोपात नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अनुभवाधारित शिक्षण, प्रत्यक्ष निरीक्षण, कौशल्य विकास व संशोधनास महत्त्व दिले आहे. या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक स्थळे, किल्ले, मंदिरे, लेणी, स्मारके, शिलालेख व स्थानिक ऐतिहासिक वारशाचा प्रत्यक्ष अभ्यास करावा, माहिती संकलित करावी आणि त्याचे शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण करावे, यासाठी क्षेत्रीय कार्य उपयुक्त ठरणार आहे. असे मत त्यांनी मांडले.

इतिहास विभाग प्रमुख तथा इतिहास संशोधन केंद्र संचालक डॉ. विजया साखरे यांनी आपल्या मनोगतात ‘जगत्तुंग’ या भिंतीपत्रकाचे महत्त्व विशद केले. भिंतीपत्रकाच्या माध्यमातून ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे, प्राचीन व मध्ययुगीन इतिहास, सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक स्थळे, किल्ले, कला व स्थापत्य तसेच विविध ऐतिहासिक घटनांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो. विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य, सर्जनशीलता व इतिहासविषयक संशोधनास प्रोत्साहन देण्यासाठी भिंतीपत्रक उपयुक्त ठरते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. डॉ. सुभाष रगडे हे होते. कॉलेजच्या परंपरे प्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात ‘वंदे मातरम’ या गीताने झाली आणि सांगता राष्ट्रगीताने झाली. कु. प्रिया दत्ता कदम (MA History SY) या विद्यार्थिनीने स्वागत गीत गायले. इतिहास अभ्यास मंडळाच्या सदस्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. डॉ. सुभाष रगडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. पुनम कठारे यांनी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. पी. बी. धोंडगे व डॉ. एस. डी. बचाटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इतिहास विभाग प्रमुख डॉ. विजया साखरे, डॉ. सुभाष रगडे, डॉ. पी. बी. धोंडगे, डॉ. एस. डी. बचाटे, डॉ. पुनम कठारे, प्रा. एस. एस. गडगीळे, संशोधक विद्यार्थी श्री. बी. एस. जाधव, शिक्षकेत्तर कर्मचारी श्रीमती सविता शेंडगे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास प्राध्यापक, पदवी व पदव्युत्तर वर्गातील इतिहास विषयाचे विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *