मराठवाडा

नांदेड विभागात प्रवासी व रेल्वे मालमत्तेच्या सुरक्षेसाठी विशेष कारवाई;

अकोला आणि नांदेड येथे ‘ऑपरेशन रेल सुरक्षा’ व ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी

 

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात प्रवासी तसेच रेल्वे मालमत्तेच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा बल (RPF), व लोहमार्ग पोलीस यांच्या संयुक्त प्रयत्नांतून विशेष कारवाई करण्यात येत आहे. या अंतर्गत अकोला येथे रेल्वे मालमत्ता चोरीच्या प्रकरणात एका व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले, तर हजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरील उच्च-मूल्य प्रवासी सामान चोरीच्या प्रकरणाचा तपास करून एका आरोपीस अटक करण्यात आली.

अकोला येथे रेल्वे केबल चोरीचा प्रयत्न उधळला:

‘ऑपरेशन रेल सुरक्षा’ अंतर्गत 14.10.2026 रोजी सुमारे 16:00 वाजता अकोला रेल्वे स्थानकासमोरील सिग्नल व दूरसंचार (S&T) डेपो परिसरात संशयास्पद व्यक्तीच्या हालचालीबाबत विश्वसनीय माहिती मिळाली. माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक यांनी कॉन्स्टेबल यांच्यासह तातडीने घटनास्थळी पोहोचून एका व्यक्तीस ताब्यात घेतले.

तपासणीदरम्यान त्याच्याकडे 13.18 मीटर 6 Quad रेल्वे केबल आढळून आली. पंचांच्या उपस्थितीत केलेल्या चौकशीत त्याने सदर केबल सिग्नल व दूरसंचार S&T डेपोच्या आवारातील ड्रममधून कापून बाहेर आणल्याचे आणि ती स्थानिक भंगार विक्रेत्याकडे विकून आर्थिक फायदा मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.

ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची ओळख दाऊद खान, अकोला जिल्हा, महाराष्ट्र अशी झाली.

जप्त करण्यात आलेल्या 13.18 मीटर 6 Quad, पंचांच्या उपस्थितीत जप्ती पंचनामा करून ती रेल्वे मालमत्ता ताब्यात घेण्यात आली. याप्रकरणी Railway Property (Unlawful Possession) Act, 1966 च्या कलम 3(a) अंतर्गत गुन्हा क्रमांक 05/2026 नोंद करण्यात आला आहे. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपीस भारतीय न्याय संहिता, BNSS च्या कलम 35(3) अंतर्गत नोटीस देण्यात आली असून, न्यायालयाकडून समन्स प्राप्त झाल्यास हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

6.06 लाखांच्या प्रवासी सामान चोरीचा छडा; आरोपी अटक

‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ अंतर्गत हजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरील उच्च-मूल्य प्रवासी सामान चोरीच्या प्रकरणाचा तपास करताना गुन्हे गुप्तहेर शाखा / रेल्वे सुरक्षा बल /नांदेड (CIB-D&I) आणि लोहमार्ग पोलीस, नांदेड यांच्या संयुक्त पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

लोहमार्ग पोलीस, नांदेड येथे गुन्हा क्रमांक 657/2026, भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 305(C) अंतर्गत दिनांक 08.10.2026 रोजी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. 08.10.2026 रोजी सुमारे 01:10 वाजता अजंठा एक्स्प्रेसच्या डब्बा क्रमांक H-1, F-कॅबिन, बर्थ क्रमांक 15 येथे एका महिला प्रवाशाच्या काळ्या रंगाच्या बॅगेची चोरी झाली होती. या बॅगेत 80 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र व साखळी, ₹6,000 रोख रक्कम, असा एकूण सुमारे ₹6.06 लाखांचा ऐवज होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे गुप्तहेर शाखा / रेल्वे सुरक्षा बल /नांदेड आणि लोहमार्ग पोलीस, नांदेड यांच्या संयुक्त पथकाने संबंधित डब्याचे CCTV फुटेज मिळवून त्याचे बारकाईने परीक्षण केले. CCTV फुटेज तसेच विकसित केलेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे संशयिताची ओळख पटविण्यात आली.

त्यानंतर नांदेड शहर तसेच हिंगोली आणि बसमत परिसरात गोपनीयरीत्या शोध व पडताळणी करण्यात आली. मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे संशयित रुपेश, वय 20 वर्षे, हिंगोली जिल्हा, महाराष्ट्र याचा ठावठिकाणा निश्चित करण्यात आला.

15.10.2026 रोजी सुमारे 18:00 वाजता संयुक्त पथकाने बसमत येथील बुधवारपेठ परिसरात, बागल हॉस्पिटलजवळ, कारवाई करून त्यास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने सदर चोरीमध्ये सहभाग असल्याची कबुली दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर त्यास लोहमार्ग पोलीस, नांदेड कार्यालयात आणून 15.10.2026 रोजी सुमारे 19:30 वाजता अटक करण्यात आली.

आरोपीस 16.10.2026 रोजी माननीय न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग (JMFC), नांदेड न्यायालयासमोर हजर करून पोलीस कोठडी रिमांड (PCR) मागण्यात येणार आहे. चोरीस गेलेले सोन्याचे दागिने व इतर मालमत्ता हस्तगत करण्यासाठी तपास सुरू असून, संयुक्त पथकाकडून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

नांदेड विभाग रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत असून, प्रवाशांच्या मालमत्तेची चोरी, रेल्वे मालमत्तेची चोरी तसेच इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी CCTV निगराणी, गुप्त माहितीचे संकलन, तपास व संयुक्त कारवाई यावर विशेष भर देण्यात येत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *