जिला

जागतिक हात धुवा दिनानिमित्त जिल्ह्यात जनजागृती

 

 

 

नांदेड,१५- जागतिक हात धुवा दिनानिमित्त नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत आणि आरोग्य संस्थांच्या माध्यमातून जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. साबणाने हात स्वच्छ धुण्याची सवय अंगीकारून संसर्गजन्य आजारांपासून बचाव करावा, यासाठी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना हात धुण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये जागतिक हात धुवा दिन साजरा करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हाभर विविध उपक्रम राबविण्यात आले.

मुदखेड तालुक्यातील बारड येथे आयोजित कार्यक्रमात गट विकास अधिकारी शेखर देशमुख यांनी विद्यार्थ्यांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. गीत आणि तालाच्या माध्यमातून हात धुण्याच्या विविध टप्प्यांची माहिती देत त्यांनी स्वच्छतेचे महत्त्व स्पष्ट केले. यावेळी विस्तार अधिकारी एन.सी. बंगाळे, ग्रामविकास अधिकारी सतीश लाठकर, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. शेंबोली येथेही जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. रूपाली भगत, ग्रामसेवक प्रकाश कोंडेकर, मुख्याध्यापक चंपक मुनेश्वर यांच्यासह शिक्षक आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

मुखेड तालुक्यात जाम बुद्रुक येथे गटविकास अधिकारी शिवाजी ढवळे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. विस्तार अधिकारी धर्मेकर यांची यावेळी उपस्थिती होती. हिप्परनाळी, सलगरा खुर्द, हंगरगा आणि राजूरा बुद्रुक येथेही हात धुवा दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आले.

अर्धापूर तालुक्यात गटविकास अधिकारी यू.डी. तोटावाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती करण्यात आली. खैरगाव आणि आमदाबाद तांडा येथे तोटावाड यांनी उपस्थित राहून हात धुण्याचे महत्त्व सांगितले. पिंपळगाव महादेव, चाबरा तांडा, लोणी बुद्रुक, भोगाव, सावरगाव, दाभड, लोणी खुर्द, चेनापूर आणि शेलगाव बुद्रुक यांसह विविध गावांमध्येही उपक्रम राबविण्यात आले.

नांदेड तालुक्यातील भणगी, कल्लाळ आणि कामठा खुर्द, किनवट तालुक्यातील आप्पाराव पेठ, माहूर तालुक्यातील करंजी, वाई बाजार आणि साकूर, तसेच हिमायतनगर तालुक्यातील वडगाव, दाबधरी, पोटा खुर्द आणि कोंढा तांडा येथे जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात आला. हिमायतनगर येथील जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेसह वडगाव तांडा आणि बोरवाडी येथेही जनजागृती करण्यात आली.

लोहा तालुक्यातील मारतळा येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक रवी ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना हात धुण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. याशिवाय लोहा, कंधार, धर्माबाद, उमरी, देगलूर, भोकर, बिलोली, नायगाव, देगलूर आणि हदगाव तालुक्यांतही विविध ठिकाणी कार्यक्रम उत्साहात पार पडले.

हात स्वच्छ धुण्याची सवय ही वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. त्यामुळे साबणाने योग्य पद्धतीने हात धुण्याची सवय दैनंदिन जीवनात अंगीकारावी आणि कुटुंबासह समाजातही त्याबाबत जनजागृती करावी, असा संदेश या उपक्रमांतून देण्यात आला.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *