महाराष्ट्रा

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नांदेड व जालना येथून नागपूरसाठी विशेष रेल्वेगाड्या

 

नागपूर येथे 20 ऑक्टोबर 2026 रोजी आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यास उपस्थित राहणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड–नागपूर–नांदेड आणि जालना–नागपूर–जालना दरम्यान विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
1. गाडी क्रमांक 07085/07086 नांदेड–नागपूर–नांदेड विशेष:
गाडी क्रमांक 07085 नांदेड–नागपूर विशेष 19 ऑक्टोबर 2026 (सोमवार) रोजी नांदेड येथून रात्री 20.00 वाजता सुटून मुदखेड, भोकर, हिमायतनगर, किनवट, आदिलाबाद आणि पिंपळकुट्टी मार्गे 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.25 वाजता नागपूर येथे पोहोचेल.

या गाडीला एकूण 16 डबे असतील. (एकुण 1 फेरी)
गाडी क्रमांक 07086 नागपूर–नांदेड विशेष 20 ऑक्टोबर 2026 (मंगळवार) रोजी नागपूर येथून रात्री 23.55 वाजता सुटून पिंपळकुट्टी, आदिलाबाद, किनवट, हिमायतनगर, भोकर आणि मुदखेड मार्गे 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.00 वाजता नांदेड येथे पोहोचेल. या गाडीला एकूण 16 डबे असतील. (एकुण 1 फेरी)
2. गाडी क्रमांक 07083/07084 जालना–नागपूर–जालना विशेष:
गाडी क्रमांक 07083 जालना–नागपूर विशेष 19 ऑक्टोबर 2026 (सोमवार) रोजी जालना येथून सायंकाळी 17:00 वाजता सुटून परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम आणि अकोला मार्गे 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.10 वाजता नागपूर येथे पोहोचेल. या गाडीला एकूण 19 LHB डबे असतील. (एकुण 1 फेरी)

गाडी क्रमांक 07084 नागपूर–जालना विशेष 21 ऑक्टोबर 2026 (बुधवार) रोजी नागपूर येथून रात्री 1.00 वाजता सुटून अकोला, वाशिम, हिंगोली, बसमत, पूर्णा, परभणी, मानवत रोड, सेलू आणि परतूर मार्गे त्याच दिवशी दुपारी 12.00 वाजता जालना येथे पोहोचेल. या गाडीला एकूण 19 LHB डबे असतील. (एकुण 1 फेरी)
धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांना या विशेष रेल्वेगाड्यांमुळे अतिरिक्त प्रवास सुविधा उपलब्ध होणार आहे. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे रेल्वे प्रशासनाने आवाहन केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *