शहर
मनपा शाळा क्रमांक १२ हैदर बाग येथे वाचन प्रेरणा दिन साजरा

नांदेड : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा क्रमांक १२, हैदर बाग, नांदेड येथे भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचन संस्कृती विकसित व्हावी आणि ज्ञानाचा विस्तार व्हावा, यासाठी वाचनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध पुस्तके वाचून वाचन प्रेरणा दिन साजरा केला.
कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नियमित वाचनाची प्रेरणा देण्यात आली.



