नांदेड विभागाची विशेष तिकीट तपासणी मोहीम; 24 गाड्यांच्या तपासणीत 506 प्रकरणे, 4.34 लाखांचा महसूल

नांदेड विभागात विनातिकीट व अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी दिनांक 16 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 05.00 ते रात्री 22.00 वाजेपर्यंत विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सर्व तिकीट तपासणी पथकांनी सक्रिय सहभाग घेतला.
मोहिमेचे निरीक्षण श्री. शैलेश कुमार सिंह, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक (नांदेड) यांनी केले. या मोहिमेत एकूण 31 कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत 24 रेल्वे गाड्यांची तपासणी केली.
तपासणीदरम्यान विनातिकीट प्रवास (Travelling Without Ticket – TWT) करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात आली. TWT अंतर्गत एकूण 341 प्रकरणे नोंदविण्यात आली असून त्यातून ₹1,84,850/- भाडे आणि ₹1,70,555/- दंड, असा एकूण ₹3,55,405/- महसूल प्राप्त झाला.
तसेच IRT अंतर्गत 83 प्रकरणांमधून ₹22,640/- भाडे आणि ₹41,500/- दंड, असा एकूण ₹64,140/- महसूल प्राप्त झाला. UBL अंतर्गत 82 प्रकरणांमधून ₹14,950/- रक्कम प्राप्त झाली.
अशाप्रकारे या विशेष तिकीट तपासणी मोहिमेत एकूण 506 प्रकरणे नोंदविण्यात आली असून ₹4,34,495/- इतका एकूण महसूल प्राप्त झाला.
रेल्वे प्रशासन प्रवाशांना आवाहन करते की, त्यांनी नेहमी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा आणि रेल्वेच्या नियमांचे पालन करावे. विनातिकीट व अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध भविष्यातही अशा विशेष तिकीट तपासणी मोहिमा सातत्याने राबविण्यात येतील.



