आंतर शालेय राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत ज्ञान माता विद्या विहार शाळेचा संघ उपांत्य फेरीत दाखल

नांदेड दि. 18 –
कोल्हापूर येथे खेळण्यात येत असलेल्या आंतरशालेय जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत शाळेच्या 14 वर्षाखालील ज्ञान माता विद्या विहार नांदेड (लातूर विभाग) मुलांच्या संघाने नाशिक विभागावर 3-0 फरकाने मात देत विजेतेपद पटकावले. या शानदार विजयामुळे लातूर विभाग उपांत्य फेरीत पोहोचला आहे. अंतिम सामना 19 ऑक्टोबर रोजी होणार आहे. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सांधिक खेळ, जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश संपादन केले.
विजयी संघाला ज्ञान माता विद्या विहार शाळेचे क्रीडा शिक्षक फेलिक्स पिल्ले, अलेक्स के., श्री विष्णु शिंदे सौ. श्वेता ठाकूर, सौ. यदुकृष्णा यांचे मार्गदशन लाभले.
सोमवार, दि. 19 ऑक्टोबर रोजी होणार्या उपांत्य फुटबॉल स्पर्धेसाठी ज्ञान माता विद्या विहार शाळेचे प्राचार्य फादर ईग्नाथी, शाळेचे अधीक्षक फादर आनंद, सिस्टर्स, क्रीडा शिक्षक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शाळेच्या संघाला शुभेच्छा दिल्या.



