कृषी

सोमवारी ट्वेन्टी वन शुगर्ससमोर शेतकर्‍यांचा ठिय्या आंदोलन

 

परभणी,( परभणी जिल्हा प्रतिनिधी) : परभणी कारखाना प्रशासनाने ऊसाची पहिली उचल 2 हजार 700 रुपये प्रति टन द्यावी, या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकरी सोमवारी सायखेडा येथील ट्वेन्टीवन शुगर्स कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन करणार आहेत. सोनपेठ तालुक्यातील सायखेडा येथील ट्वेन्टी वन शुगर्स कारखान्याने अद्याप शेतकर्‍यांना ऊसाची पहिली उचल दिली नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. सोनपेठ तालुक्यातील शेकडो ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी आपला ऊस ट्वेन्टी वन शुगर्स कारखान्याकडे घातला आहे.

 

ऊसाची पहिली उचल 2 हजार 700 रुपये प्रति टन द्यावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून ऊस उत्पादक शेतकरी करीत आहेत. त्यासंबंधी कारखाना प्रशासनास निवेदनही देण्यात आले आहे. सोनपेठ कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामेश्‍वर मोकाशे यांनी याबाबत वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र, ट्वेन्टी वन शुगर्स कारखाना प्रशासनाद्वारे त्या मागणीची दखल घेतली जात नाही. त्यामुळेच सोमवारी ऊस उत्पादक शेतकरी या कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन करणार आहेत, अशी माहिती रामेश्‍वर मोकशे यांनी दिली असून जास्तीत जात ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी या ठिय्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *