कृषी

भाऊराव ‘चा २ हजार ५०० पहिला हप्ता ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा

नांदेड दि. २४ भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखानाचा गळीत हंगाम २०२३ -२०२४ वर्षासाठी २ हजार ५०० रुपयांचा पहिला हप्ता ऊस उत्पादक सभासदांच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संबंधित शाखांत वर्ग करण्यात आल्याची माहीती भाऊरावचे अध्यक्ष गणपतराव तिडके यांनी दिली आहे.

यावर्षी भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाण्याने ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादक सभासदांच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संबंधित शाखांत गळीत हंगाम २०२३ -२०२४ वर्षासाठी २ हजार ५०० रुपयांचा पहिला हप्ता वर्ग केला आला आहे. ऊस उत्पादकांना शक्य तितके लवकर उसाचे पैसे व कार्यक्षेत्र व परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस गाळप व्हावा यासाठी भाऊरावचे अध्यक्ष गणपतराव तिडके, उपाध्यक्ष नरेंद्र चव्हाण यांच्यासह सर्व संचालक व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *