क्राईम

वडिल रागावल्याने घरातुन निघुन गेलेली मुलगी एका तासात शोधण्यास अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध पथकास यश

 

उपरोक्त विषयाचे अनुषंगाने जिल्हयात हरवलेले महिला / बेपत्ता मुले/ मुली यांचा शोध घेण्यासाठी जिल्हा स्तरावर मा. पोलीस अधीक्षक, श्रीकृष्ण कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सदर कक्षामार्फत हरवलेले महिला/पुरुष, बेपत्ता मुले/मुली यांचा शोध घेण्याचे काम चालू आहे.

दिनांक 22/12/2023 रोजी नांदेड शहरातील एक 45 वर्षाचे इसम आपल्या 16 वर्षाच्य मुलीला घरगुती कारनावरुन रागावले त्यांची मुलगी मोबाईल फोन घरीच ठेऊन शेजा-याकडे जाऊन येते म्हणुन घराबाहेर पडली. बराच वेळ झाला तरी मुलगी घरी परत आली नाही म्हणुन वडिलांनी शेजा-याकडे जाऊन चौकशी केली असता ती मुलगी शेजा-याकडे गेलीच नसल्याचे आढळुन आले. त्यानंतर सदर इसम हे घाबरलेल्या स्थितीत तात्काळ पोलीस अधीक्षक कार्यालय गाटुन तेथील अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षातील पोलीस उप निरीक्षक प्रियंका आघाव यांना झाला प्रकार सांगीतला व मुलीचा शोध घेण्याची विनंती केली.

पोलीस उप निरीक्षक प्रियंका आघाव व त्यांच्या शोध पथकांनी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विलंब न लावता तात्काळ तीन टिम बनवुन मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. सि.सि.टि.व्ही. फुटेज चेक केले, मुलीचे मित्र/मैत्रीनीकडे प्रत्यक्ष भेटून विचारपुस केली. मुलीने मोबाईल फोन घरीच ठेवल्याने मुलीचा शोध घेण्यास अडचणी येत होत्या. मित्र/मैत्रीनीकडे शोध घेत असतांना सदरची मुलगी सकाळी एका मैत्रीनीला भेटली असल्याचे समजले तीच्याकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर मुलीचा शोध घेतला असता ती मुलगी एका ठिकाणी एकटीच बसली असल्याचे समजले. तेव्हा मुलीच्या वडिलास सोबत घेऊन जाऊन मुलीस ताब्यात घेतले व पोलीस अधीक्षक कार्यालयात आणुन पोलीस उप निरीक्षक प्रियंका आघाव व मा. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे सर यांनी स्वतः तीचे व तीच्या आईवडिलांचे समुपदेशन करुन सुखरुप मुलीस आईवडिलांचे स्वाधीन केले.

सदरची शोध मोहिम यशस्वी करण्यासाठी महिला पोलीस उप निरीक्षक प्रियंका आर. आघाव, पोलीस अमलदार अच्युत मोरे, सायलु बिरमवार, गणेश जाधव, दिपक ओढणे, यशोदा केंद्रे यांनी परिश्रम घेतले. शोध मोहिमेसाठी सायबर सेलची देखील मदत घेतली.

सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे, यांनी कौतुक करुन शाबासकीची थाप दिली.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *