कृषी

कृषि विभागाच्‍या वतीने माळेगाव यात्रेत डॉ. शंकरराव चव्हाण भव्य कृषि प्रदर्शन;

 

नांदेड,29- नांदेड जिल्हातील शेतकरी बंधूंना कळविण्यात येते की, प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी श्रीक्षेत्र माळेगांव यात्रा, ता. लोहा, जि. नांदेड येथे जिल्हा परिषदेच्या कृषि दिनांक 10 जानेवारी ते 14 जानेवारी 2024 दरम्यान खंडोबा रायाच्या यात्रेनिमीत्त डॉ. शंकरराव चव्‍हाण भव्य कृषि प्रदर्शन व डॉ. शंकराराव चव्‍हाण कृषिनिष्‍ठ शेतकरी पुरस्‍कार वितरण सोहळयाचे आयोजन करण्यात आहे.

कृषी प्रदर्शनात जिल्हास्तरीय फळे, मसाला पिके व भाजीपाला प्रदर्शन स्पर्धेा घेण्‍यात येणार आहेत. या प्रदर्शनात जिल्हयातील फळे, मसाला पिके व भाजीपाला उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी आपले शेतातील फळे, भाजीपाला व मसाला पिकांचे उत्कृष्ट नमुने दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी दुपारपर्यंत माळेगाव येथील कृषी प्रदर्शनात आणून ठेवावेत. प्रदर्शनात ठेवलेल्या फळे, मसाला पिके व भाजीपाल्याच्या नमुन्यास प्रत्येक वाणातून प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक काढण्यात येणार असून, विजेत्या शेतकऱ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सदर बक्षीस व प्रमाणपत्र प्रदर्शन संपल्यानंतर जिल्हा परिषद येथे कार्यक्रम घेवून देण्यात येईल.

डॉ. शंकरराव चव्हाण कृषि प्रदर्शनात एकूण 130 स्टॉलचे नियोजन केले आहे. त्यामध्ये बियाणे उत्पादन करणाऱ्या कंपनी, रासायनिक खते उत्पादन करणाऱ्या कंपनी, किटकनाशक औषधे उत्पादन करणाऱ्या कंपनी, ट्रॅक्टर उत्पादन करणाऱ्या कंपनी, शेती उपयोगी औजारे उत्पादन करणाऱ्या कंपनी, सेंद्रीय उत्पादने तयार करणारे शेतकरी, महिला बचत गट (MSRLM), आरोग्य विभाग, महिला बाल कल्याण विभाग, समाजकल्याण विभाग, तसेच कृषि विद्यापीठ, कृषि विज्ञान केंद्र, कृषि विभाग महाराष्ट्र शासन, महाबीज, महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ, खादी ग्रामोद्योग, इत्यादी विविध प्रकारचे स्टॉल्स प्रदर्शानात असणार आहेत. आतापर्यंत 70 स्टॉलची नोंदणी झाली असून ज्यांना आपले स्टॉल प्रदर्शनादरम्यान उभारावयाचे आहेत अशांनी कृषि विभाग, जिल्हा परिषद नांदेड येथे 1 जानेवारी 2024 पर्यंत नोंदणी करावी.

दिनांक 10 जानेवारी 24 रोजी माळेगाव येथे डॉ. शंकरराव चव्हाण कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन व त्यानंतर डॉ. शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्‍यात येणार आहे. तरी जिल्हयातील शेतकऱ्यांनी सदर पुरस्कार समारंभासाठी उपस्थित रहावे व पाच दिवस चालणाऱ्या कृषि प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे व जिल्‍हा कृषी अधिकारी व्‍ही.आर. बेतीवार यांनी केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *