युवा पत्रकार हैदर अली यांना डिजिटल मीडिया पुरस्कार जाहीर

नांदेड – मीमांसा फाउंडेशन, दैनिक समीक्षा, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि मंथन क्रिएटिव्ह ग्रुप तर्फे दिला जाणारा मंथन क्रिएटिव्ह डिजिटल मीडिया पुरस्कार यंदा एमसीएन उर्दूचे युवा पत्रकार हैदर अली यांना जाहीर झाला आहे. येत्या 5 जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमा दरम्यान पत्रकार हैदर अली यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. पत्रकार हैदर अली हे 2009 साली पासून पत्रकारिता क्षेत्रात आहे. दैनीक उर्दू गोदावरी आब्जर्वर, दैनिक उर्दू बोलचाल, दैनिक औरंगाबाद टाइम्स मध्ये देखील काम केले आहे. 2013 पासून ते एमसीएन उर्दू चॅनेल मध्ये काम करत आहेत. एमसीएन उर्दू चॅनेलच्या माध्यमातून त्यांनी अन्यायाला वाचा फोडने , गोर गरिबांना न्याय देण्याचे काम करत आहेत. विशेष म्हणजे 2023 साली हैदर अली यांची नेशनल न्यूज चॅनल भारत एक्सप्रेस मध्ये नांदेड जिल्हा प्रतिनिधी पदी निवड झाली आहे. हैदर अली यांना पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल पत्रकार आणि मित्र परिवारानी शुभेच्छा दिल्या.



