जिला

माळेगाव यात्रेसाठी संकेतस्थळ लाईव्ह दिशादर्शकासह यात्रेसंदर्भातील माहिती नागरिकांनी संकेतस्‍थळाला भेट देण्‍याचे आवाहन

 

नांदेड,8- दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या लोहा तालुक्यातील माळेगाव येथील श्री खंडोबाची यात्रा येत्या 10 जानेवारीपासून सुरू होत आहे. भाविकांच्या सुविधेसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून
माळेगाव यात्रेसंदर्भात संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.
या संकेतस्थळावर लाईव्ह दिशादर्शकासह यात्रेची इत्यंभूत माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दोन दिवसात 1 हजार 657 व्हिजीटरर्संनी या संकेतस्‍थळांला भेटी दिल्‍या आहेत. वेळोवळी सदर संकेतस्‍थळ अपडेत करण्‍यात येणार आहे.

दिनांक 10 जानेवारी ते 14 जानेवारी 2024 दरम्यान माळेगाव यात्रेत सहभागी होणा-या भाविकांनी http://malegaonyatra.ceozpnanded.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने करण्‍यात आले आहे. या संकेतस्‍थळावर माळेगाव यात्रेची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये माळेगाव यात्रेत देण्यात आलेल्या सुविधा, नागरिकांनी माळेगावात कसे यावे, आपत्कालीन संपर्क नंबर, लाईव्ह दिशादर्शकही यात देण्यात आले आहेत. संपूर्ण माळेगाव यात्रेचा नकाशा, माळेगाव यात्रेतील कार्यक्रम, कला महोत्सवाच्या ठिकाण, मंदिराचे ठिकाण, कुस्त्याचे मैदान, कृषी व पशुप्रदर्शन, शौचालयाचे ठिकाण अशा वेगवेगळ्या ठिकाणी किंवा जिथे आपल्याला जायचे आहे त्या ठिकाणी संकेतस्थळावरील मॅपच्या मदतीने भाविकांना जाता येणार आहे. अशा पद्धतीने या संकेतस्थळाचा फायदा होणार आहे. तसेच या वेबसाईटवर मंदिर स्थळदर्शक नकाशा, यात्रेची पंरपरा व इतिहासाची माहिती देण्यात आली आहे.

याशिवाय माळेगाव यात्रेची फोटो गॅलरी देखील या संकेतस्थळावर राहणार आहे. यात्रेदरम्यानचे विविध कार्यक्रमांच्या फोटोसह हे संकेतस्थळ यात्रा कालावधीत वेळोवेळी अपडेट करण्यात येणार आहे. तरी जास्‍तीत जास्‍त नागरिकांनी सदर संकेतस्थळाला भेट देऊन यात्रे संदर्भातील माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन जिल्‍हा परिषदेच्‍या उप मुख्य कार्यकारी अधिकारी तथा माळेगाव यात्रा सचिव मंजूषा कापसे यांनी केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *