मनोरंजन

नांदेड येथे दोन दिवस रंगणार बाल कलावंताचा नाट्य आविष्कार · बालनाट्य स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर

नांदेड, दि. 9 :- महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचलनालय आयोजित 20 वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी नांदेड येथे 10 व 11 जानेवारी 2024 रोजी कुसुम सभागृहात सकाळी 11 ते सायं. 5 या वेळेत संपन्न होणार आहे. या स्पर्धेत नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील एकूण 11 संघांचा समावेश आहे. या स्पर्धेस रसिक प्रेक्षकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून बाल कलावंताना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी 10 जानेवारी रोजी दुपारी १२ वा. केंब्रीज माध्यमिक विद्यालय, नांदेडच्या वतीने नाथा चितळे लिखित, वैभव देशमुख दिग्दर्शित “चिऊताई माझ्याशी बोल ना”, दुपारी 1.15 मिनिटांनी बालगंधर्व सांस्कृतिक, कला, क्रीडा व युवक मंडळ, परभणीच्या वतीने त्र्यंबक वडसकर लिखित, मधुकर उमरीकर दिग्दर्शित “काहीतरी चुकतंय वाटतय”, दुपारी 2.30 वा. ज्ञानभारती विद्यामंदिर, नांदेडच्या वतीने धनंजय सरदेशपांडे लिखित, राहुल जोंधळे दिग्दर्शित “बुद्धाची गोष्ट”, दुपारी 3.45 मिनिटांनी जिंतूर शिक्षण संस्था संचलित डॉ. सुभाषचंद्र राठी बालक विद्या मंदिर, जिंतूरच्या वतीने धनंजय सरदेशपांडे लिखित, नागेश कुलकर्णी दिग्दर्शित “मदर्स डे” दुपारी 5 वा. नृसिंह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पोखरणीच्या वतीने “जड झाले ओझे” या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.

स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी 11 जानेवारी रोजी सकाळी 11 वा. ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल, नांदेडच्या वतीने धनंजय सरदेशपांडे लिखित, स्वाती घाणेकर दिग्दर्शित “एलियन्स द ग्रेट”, दुपारी 12 वा. राजाराम काकानी सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, धर्माबादच्या वतीने नाथा चितळे लिखित श्रीनिवास दर्शन दिग्दर्शित “चिऊताई माझ्याशी बोल ना”, दुपारी 1.15 मिनिटांनी शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स, नांदेडच्या वतीने आसिफ अन्सारी लिखित, महेश घुंगरे दिग्दर्शित “वडाळा ब्रिज”, दुपारी 2.30 मिनिटांनी टायनी एंजल्स स्कूल, नांदेडच्या वतीने धनंजय सरदेशपांडे लिखित,गौतम गायकवाड दिग्दर्शित “करामती पोर”, दुपारी 3.45 मिनिटांनी राजीव गांधी युवा फोरम, परभणीच्या वतीने त्र्यंबक वडसकर लिखित उपेंद्र दुधगावकर दिग्दर्शित “जगण्याचा खो” आणि दुपारी 5 वा. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, फुलकळस, परभणीच्या वतीने गोविंद गोडबोले लिखित डॉ. सिद्धार्थ मस्के दिग्दर्शित “गोष्टीची गोष्ट” या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे असे नांदेड केंद्रावरील समन्वयक दिनेश कवडे यांनी कळवले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *