जिला

माळेगाव यात्रेत भव्य पशु प्रदर्शन लालकंधारीचे संवर्धनसाठी प्रयत्न करु; आमदार श्यामसुंदर शिंदे

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा, मिडिया सेंटर, मिलिंद व्यवहारे,11- लाल कंधारी हे नांदेड जिल्ह्याचे वैभव असून त्याचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करु असे प्रतिपादन आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी केले.
     जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अश्व व विविध पशु प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, तहसीलदार लाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुक्कावार, डॉ प्रविण घुले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बोधनकर, नायब तहसीलदार मोकले, शाम पवार, पुंडलिकराव बोरगावकर, डॉ. पुरी, डॉ. केंद्रे, राम पाटील, चंद्रशेखर पाटील, रोहित शिंदे आदींची उपस्थिती होती. 

यात्रेत विविध जातीचे श्वान
माळेगाव यात्रेत पशु प्रदर्शनात विविध कुंत्र्यांच्या जातीमध्ये राँट, ब्रिलर, लाँबर डॉग आदी कुत्र्यांच्या जातींनी हजेरी लावली. 
येथे 60 हजाराचा श्वान विक्रीसाठी होता. छोट्या पिलांची श्वान जोडीचा 25 हजारावर भाव होता. पॅरोटविक कोंबडा 9 हजार  रुपये, 11 लाखाची देवणी जातीच्या गाय पाहवयास मिळाली.  येथे विविध पशूमध्ये घोडे, गाढव, उंट, कोंबडे तसेच विविध जातीचे कुत्रे पहावयास मिळाले.

 विविध जातींचे अश्व
घोडे बाजार हे माळेगाव यात्रेचे आकार्षण आहे. येथे  विविध जातीचे अश्व दाखल झाले आहेत.
यात्रेत यावेळी सिंध, काठेवाड, धारवाड, पंजाब, नुकरा, स्टँलिकन, बाँडा, हुलकारी, पंचकल्याण आदी जातीचे अश्व दाखल आहेत. यावेळी अश्वांच्या विविव कवायती प्रेक्षकांना दाखविल्या.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *