जिला

सुट्टीच्या दिवशी असलेल्या शिकाऊ व पक्की अनुज्ञप्ती चाचणीसाठी सुधारित वेळापत्रक

नांदेड दि. 20 :- श्री राम लल्ला प्राण-प्रतिष्ठा दिनानिमित्त सोमवार 22 जानेवारी 2024 रोजी शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयात शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्की अनुज्ञप्ती चाचणीसाठी 22 जानेवारी रोजीचे ऑनलाईन अपॉईंटमेंट घेतलेल्या अर्जदारांचे या दिवसाचे सुधारित अपॉईंमेंट वेळापत्रक करण्यात आले आहे. तरी संबंधीत अर्जदाराने आपली अपॉईंटमेंट तारीख sarathi.parivahan.gov.in या संकेतस्थळावर तपासून मिळालेल्या दिनांकास शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती चाचणीसाठी कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.
तसेच योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी 22 जानेवारी 2024 रोजीचे ऑनलाईन अपॉईंटमेंट घेतलेल्या अर्जदार व वाहन मालक/चालक यांचे या दिवसाचे अपॉईंमेंट सुधारित वेळापत्रक करण्यात आले आहे. तरी त्यांनी त्यांचे वाहन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण तपासणीसाठी सुट्टी लगतच्या पुढील सात दिवसात या कार्यालयाच्या मौजे वाघी येथील ब्रेक टेस्ट ट्रॅक येथे सादर करावेत. तसेच अपॉईंमेंट घेतलेल्या सर्व अर्जदार व वाहनधारक यांनी याबाबतची नोंद घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *