क्राईम

पंजाब येथील गँगस्टर अमृतपालसिंघ बॉठ याच्या गँगमधील जुगराजसिंघ काबलसिंघ नांदेड पोलीसांच्या ताब्यात

जि. तरणतारण राज्य, पंजाब येथील पो. स्टे. जबाल येथील गुरनं 04/2024 कलम 302, 120व, 34 भादंवि सह कलम 3/25 आर्म अॅक्ट मधील फरार आरोपी नामे जुगराजसिंघ पि. काबलसिंघ हा पंजाब मध्ये खुन करुन नांदेड पळुन आल्याचे गोपनिय माहिती मा. वरिष्ठांना मिळाली होती. त्यावरुन मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी नांदेड पोलीसांचे एक पथक तयार करुन वरील फरार आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते.
त्यावरुन सदर पथकाने नांदेड मध्ये दोन दिवस वरील फरार आरोपीचा शोध घेतला व सायवर सेलच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण करुन आरोपी मोबाईल लोकेशन हस्तगत केले असता सदर आरोपी हा नांदेड वरुन श्रीगंगानगर एक्सप्रेसने पंजाबकडे निघाल्याचे कळाले. सदर आरोपीचे तिकीट व बोगी नं. व सिट क्रमांकाची माहिती हस्तगत करुन आरोपी पकडण्यासाठी वाशिम, आकोल्याकडे निघाले. परंतु सदर आरोपी हा चालत्या ट्रेन मध्ये असल्याने त्याचा बोगी व शिट क्रमांक लोहमार्ग पोलीस ठाणे, अकोला यांना सविस्तर माहिती देवून अकोला रेल्वे जंक्शनवर दहा मिनिटे रेल्वे थांबणार असल्याचे सांगून आरोपीस ताब्यात घेणेबाबत कळविले. त्यानंतर लगेच नांदेड पोलीस पथक अकोला रेल्वे स्थानक येथे पोहचुन आरोपीस ताब्यात घेऊन नांदेड येथे पोहचले.
आरोपी जुगराजसिंघ यांची सविस्तर चौकशी केली असता तो कुख्यात गैंगस्टर अमृतपालसिंघ बॉट
रा. मियापुर ता. जि. तरणतारण याचा जवळचा हस्तक असून तो तरणतारण येथे राहून त्याच्या गँगसाठी
काम करतो. अमृतपालसिंघ बाँठ हा सद्या जर्मनी येथे असून तेथून त्याची गँग चालवितो. त्याचेवर पंजाब
राज्यात जवळपास 18 ते 20 गुन्हे दाखल असून त्यापैकी 02 गुन्हे बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायदा
(UAPA) प्रमाणे दाखल आहेत. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक भोकर खंडेराव धरणे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक, संतोष शेकडे, पोलीस उप निरीक्षक दशरथ आडे, गंगाप्रसाद दळवी, पोहेकों राजु सिटीकर, दिपक ओढणे, सायबर सेल पोकों राजीव बोधगिरे, अनिल बिरादार, अशोक म्हस्के, अकबर पठाण यांनी पार पाडली.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *