जिला
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मूळ ठिकाणीच बसवण्या साठी उपोषण

किनवट (प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मूळ ठिकाणीच बसवण्यात यावा, पुतळा आणून आठ महिने झाले तरीही अद्यापही पुतळ्याचे काम चालू केलेले नाही. यासाठी तीन शिवप्रेमींनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण दि१८ फेब्रुवारी पासून उपोषण सुरू केले आहे.
उपोषणकर्त्यात अमरदीप कदम, संतोष अडकीने व शेख फैय्याजोद्दीन यांचा समावेश आहे. निवेदन देऊन १२ दिवसांचा कालावधी लोटला तरी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम हाती न घेतल्याने सकल मराठा समाज व शिवप्रेमी जनतेच्या वतीने उपोषण सुरू केले आहे.



