जिला

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची मूल्य पुढच्या पिढीत रुजवा- सीईओ मिनल करनवाल

 

नांदेड,14 एप्रिल- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची मूल्य पुढच्या पिढीत रुजवण्याची जबाबदारी आपली आहे, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मिनल करनवाल यांनी केले.
नांदेड जिल्‍हा परिषद अधिकारी-कर्मचारी महात्‍मा ज्‍योतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्‍त जयंती महोत्‍सव समितीच्‍या वतीने आज जिल्‍हा परिषदेत झालेल्‍या भीम जयंती कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जिल्‍हा परिषदेच्‍या यशवंतराव चव्‍हाण सभागृहात संपन्‍न झालेल्‍या कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळन- कदम, अमित राठोड, जयंती मंडळाचे अध्यक्ष पवन तलवारे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शिवशक्ती पवार, उप शिक्षणाधिकारी बंडू अमदुरकर, सहाय्यक गट विकास अधिकारी अभय नलावडे, बालाजी नागमवाड आदींची मंचावर उपस्थित होती.

पुढे त्या म्‍हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रखांड पंडित होते. त्यांनी अनेक पुस्तकांचे वाचन करून अनेक पुस्तकांचे लेखन केलेले आहे. त्यांची ही प्रेरणा घेऊन आपणही पुस्तके वाचावीत. तसेच लहान मुलांना आणि युवकांना पुस्तक वाचण्यासाठी पुढाकार घ्यावा असेही त्या म्हणाल्या. कठीण परिस्थितीतही जीवनात कसं उभ राहावं हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातून आपल्याला शिकायला मिळते. त्यामुळे जीवनात खचून न जाता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे उभे राहण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन मिनल करनवाल यांनी यावेळी केले.

प्रारंभी उपस्थित मान्‍यवरांच्‍या हस्‍ते भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेला पुष्‍पहार अपर्ण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जयंती मंडळाच्‍या वतीने उपस्थित मान्‍यवरांचा शॉल व पुष्‍पहार देवून सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंती मंडळाचे अध्यक्ष पवन तलवारे यांनी केले. याप्रसंगी समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार राजेश जोंधळे यांनी मानले.

प्रारंभी जिल्‍हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांच्‍या उपस्थितीत जिल्‍हा परिषदेतून ढोल ताशांसह मिरवणूक काढून रेल्‍वे स्‍टेशन नजीक विश्‍वरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्‍या पूर्णाकृती पुतळयास भव्‍य पुष्‍पहार अर्पण करुन अभिवादन करण्‍यात आले. त्‍यानंतर जिल्‍हा परिषदेत अन्‍नदान व थंड पाणी वाटपाचे उद्घाटन करण्‍यात आले. त्‍यानंतर दुपारी जिल्‍हा परिषद परिसरात रुबाब भिमाचा फेम आशिष कांबळे आणि संचाचा भिमगीतांचा प्रबोधनात्‍मक कार्यक्रम घेण्‍यात आला. त्यांनी एकापेक्षा एक गीतांनी रसिकांची मने जिंकली. यावेळी जयंती मंडळाचे अध्यक्ष पवन तलवारे, सचिव राजेश जोंधळे, कोषाध्यक्ष रणजीत गजभरे, अशोक कासाराळीकर, धनंजय घुमलवार, प्रसिद्धी प्रमुख मिलिंद व्यवहारे, प्रमोद दर्डा, जितेंद्र तोटलवार, व्ही. बी. कांबळे, जीवन कांबळे, धनंजय घुमलवार, धनंजय देशपांडे, शुभम तेलेवार, भास्कर कापसे, विजय वाघमारे, प्रेमाला चौदंते, स्वाती जोंधळे, नंदलाल लोकडे, राजीव वानखेडे, प्रमोद गायकवाड, गणेश आंबेकर, सुरेश सातपुते, ओंकार पांचाळ यांच्यासह जयंती मंडळाचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *