जिला
नोडल अधिकारी मिनल करनवाल यांनी बारड, शेंबोली, रोही पिंपळगाव, डोंगरगाव, पांढरवाडी आदी गावांना भेटी


नांदेड,10- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या नोडल अधिकारी मिनल करनवाल यांनी आज मुदखेड तालुक्यातील बारड, शेंबोली, रोही पिंपळगाव, डोंगरगाव, पांढरवाडी आदी गावांना भेटी देऊन उपस्थितांना मतदान करण्यासंदर्भात आवाहन केले.
बारड येथील जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे येथे विद्यार्थिनी मतदान जनजागृतीसाठी चेहऱ्यावर तिरंगा, मी मतदान करणार, मतदान करा आदी रंगीत मुखवट्यांनी त्या सजल्या होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मतदान प्रक्रिया संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना विद्यार्थी व शिक्षकांनी अचूक उत्तरे दिली. याप्रसंगी त्यांनी शाळेतील विविध सुविधा पाहून समाधान व्यक्त केले.
शेंबोली, डोंगरगाव व पांढरवाडी येथे त्यांनी भेट घेऊन मतदान विषयासंदर्भात उपस्थितींना माहिती दिली. तसेच रोही पिंपळगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा वर्कर यांना मतदानाविषयी जागृत करुन मतदानाची शपथ दिली. यावेळी त्यांनी येथील मतदान केंद्राची पाहणी केली. मतदान केंद्रावर सुस्थितीत रॅप, व्हीलचेअर, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृह आदी सुविधांबाबत पाहणी करून चर्चा केली. या दौऱ्या दरम्यान गट विकास अधिकारी श्रीकांत बळदे, गट शिक्षणाधिकारी सुरेश पाटील, तालुका आरोग्य अधिकारी संजय कासराळीकर आदींची उपस्थिती होती.



