जिला

पत्रकारांवर एकतर्फी कारवाई नको! – जिल्हाधिकाऱ्यांचे अधिनस्थ अधिकाऱ्यांना निर्देश

 

नांदेड – मुखेड येथील एका पत्रकारावर प्रशासनाकडून तडकफडकी गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या घटनेनंतर खुलासा देण्याची संधी दिल्या शिवाय व एमसीएमसी कक्षाला कळवल्या शिवाय अशा प्रकारे पत्रकारावर एकतर्फी कुठलीही कारवाई करण्यात येवू नये, असे निर्देश संबधित अधिकाऱ्यांना मी कालच दिल्या असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज येथे सांगितले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांची भेट झाली.

यावेळी नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गोवर्धन बियाणी यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुखेड येथील घटनेबाबत जिल्हाधिकारी यांच्यासमोर आपली बाजू मांडली.त्यास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कालच संबधित अधिकाऱ्यांना मी आवश्यक त्या सूचना दिल्या असल्याचे सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या सद्या लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी हे अपेक्षित असले तरी निवडणूक आयोगाची बदनामी केली असा शोध लावून मुखेड तालुक्यात एका पत्रकारविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई तालुका स्तरावर परस्पर करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी स्तरावर कुठलीच माहिती देण्यात आली नव्हती, अशी माहिती यातून आता समोर आली आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी चर्चा केली. तसेच पत्रकारांवर अशा पद्धतीने परस्पर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येवू येऊ नये, अशी विनंती देखील जिल्हा पत्रकार संघाने यावेळी केली. त्याबाबत अधिनस्त अधिकाऱ्यांनी ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक असून तसे आदेश आपण काल झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गोवर्धन बियाणी, पञकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा समन्वयक रविंद्र संगनवार, महानगर समन्वयक प्रशांत गवळे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख माधव गोधणे,किरण कुलकर्णी,लोकशाही वृत्त वाहिनीचे कमलाकर बिरादार, आज तकचे कुवरचंद मंडले, साम मराठीचे संजय सुर्यवंशी, श्रीराम मोटरगे आदीसह अनेक पत्रकार उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *