जिला

किनवटला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यालयास मंजुरी, न्यायालयीन कामकाजासाठीचा वेळ वाचणार

 

किनवट (अकरम चव्हाण): किनवट येथे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या उभारणीसाठी मंजुरी मिळाली असून तसे पत्र २२ एप्रिल रोजी नांदेड येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्या. सुरेखा कोसमकर यांनी पाठविले आहे. नांदेड जिल्हा मुख्यालयापासून सुमारे १५० किलोमीटर अंतरावर असलेल्या किनवट आणि शेजारच्या तालुक्यांसाठी स्वतंत्र जिल्हा व सत्र न्यायालय निर्माण करावे, अशी येथील नागरिकांची अनेक दिवसांची मागणी होती.

न्यायालयीन कामकाजासाठी नांदेड येथे येत असताना नागरिकांचा वेळ तसेच पैशाचा अपव्यय होत होता. किनवट हा आदिवासी तसेच डोंगराळ तालुका आहे. या तालुक्यासाठी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय नाही. त्यामुळे येथे जिल्हा सत्र न्यायालय मुख्यालयापासून दूर अंतर

■ किनवट तालुका मुख्यालयापासून सुमारे १५० के.मी. अंतरावर आहे. त्यामुळे किनवट येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायलाय उभारावे, अशी येथील नागरिकांची मागणी होती. या मागणीसाठी विविध घटकांनीही आंदोलने केली आहेत. न्यायालय मंजूर न झाल्यास तेलंगणात जाण्याचा इशाराही दिला होता.

मंजूर करावे, अशी नागरिकांची मागणी होती. या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलनेही करण्यात आली. दरम्यान, २२ एप्रिल रोजी नांदेड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या वतीने किनवट येथील बार असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षांना पत्र पाठविले असून त्यात किनवट येथे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय उभारणीसाठी मंजुरी दिल्याचे म्हटले आहे. किनवट आणि माहूर तालुक्यासाठी विशेष बाब म्हणून या ठिकाणी भौतिक सुविधा उपलब्ध करण्याचेही या पत्रात सूचित केले आहे. दरम्यान, किनवट येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय उभारण्याचा मार्ग मोकळा झाल्याने या भागातील पक्षकार, वकिलांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण होणार आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *