जिला

मुस्लिम समाजाच्या भावना दुखवणाऱ्या रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी- धर्माबाद सकल मुस्लिम समाजच्या वतीने निवेदन

 

धर्माबाद:- म. मुबाशिर / काही दिवसापूर्वी रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज सरलाबेट यांनी मौजे. पंचाळे ता. सिन्नर जि. नाशिक या ठिकाणी सप्ताह दरम्यान प्रवचनामध्ये उपस्थित जनसमुदाय समोर मुस्लिम धर्माची व धर्मगुरुची प्रतिमा मलीन होईल असे जाणीव पुर्वक प्रवचन केले . यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या असून, दोन समाजात तेड निर्माण करणा-या रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करावे अशी मागणी धर्माबाद तालुका मुस्लिम समाज यांच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री,राज्यपाल यांच्याकडे करणात आली असून यासंदर्भातचे निवेदन दि. 20 ऑगस्ट 2024 रोजी पोलिस निरक्षक बाळासाहेब रोकडे यांच्या मार्फेत देण्यात आले.

निवेदनात म्हंटले आहे भारतात एक कोटीपेक्षा अधिक मुस्लिमांनी ईस्लाम सोडला आहे. दहा बीस वर्ष ज्यांनी मौलाना म्हणून काम केले आहे. त्यांनी ईस्लामचा सुक्षम अभ्यास केला असता त्यांना यात अन्याय ,अत्याचार शिवाय काहीही आढळून न आल्याने त्यांनी ईस्लाम धर्म सोडुन दिला आहे. मोहम्मद पैगंबर यांनी वयाच्या ५० व्या वर्षी सहा वर्षाच्या मुलीसोबत विवाह केला. ज्यांची आदर्शच अत्याचीरी आहेत त्यांच्या विषयी अजून काय सांगायचे ? अशा स्वरुपाचे त्या प्रवचनामध्ये मुस्लिम धर्माबाबत मोठया प्रमाणावर अनेक वक्त्वे रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज सरलाबेट ता. वैजापुर जि. छत्रपती संभाजीनगर यांनी केली आहेत. रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज यांच्या या वक्तव्यामुळे समस्त मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.त्यामुळे रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करण्यात यावे., तसेच कोलकत्ता येथे महिला डॉक्टरचा बलात्कार करुन क्रुर हत्या करणा-या नराधमास कठोर कारवाई करुन अटक करण्यात यावे. तसेच बंगलादेश येथे हिंदू समाज बांधवावरील झालेल्या अत्याचार विरोधात या निवेदनात जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदु बांधवावर तेथिल समाज कंटकाकडून होत असलेले हल्ले तात्काळ थांबवण्यासाठी केंद्रसरकारने पुढाकार घ्यावा.अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.सदर निवेदन पोलिस निरिक्षक धर्माबाद यांच्या मार्फेत देण्यात आला.यावेळी सामाजिक कार्यकर्ते नवीद अहमद, पत्रकार मुबशिर लाला ,खुर्रम पटेल,शेख तौफीक, इमरान पटेल, असलम खान, मिनहाज पटेल, शेख सादिक, अयूब पटेल, आवेज बेग, फरदीन बेग,इब्राहिम पटेल आदिच्या स्वाक्षरी आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *