संबल प्रकरणी मुस्लिम समाजाचा महामहीम राष्ट्रपती यांना तहसीलदार मार्फत निवेदन

(मुदखेड प्रतिनिधि मोहम्मद हकीम)
उत्तर प्रदेश राज्यातील संबल येथे जातीय दंगल उसळली आणि मंदिर तोडून मस्जिद बांधण्यात आला असल्याचा कथित प्रकरण समोर येऊन अशांतता पसरली प्रकरणी तत्कालीन पंतप्रधान पी वी नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली आणि राजकीय पक्षाच्या उपस्थितीत सन 1991 रोजी प्रार्थना स्थळ संरक्षक कायद्याची अंमलबजावणी करत येथून पुढे कोणत्याही धर्माच्या प्रार्थना स्थळांचे कोणतेही वाद काढू नये असे सर्व संमतीने ठरले होते परंतु काही असामाजिक तत्व वाद उफाळण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने दि. 29 नोव्हेंबर रोजी दुपारी ठीक 03.00 वाजता शहरातील तहसील कार्यालयात एका शिष्टंडळाने भेट घेत महसूल विभागाचे नायब तहसीलदार मारोतराव जगताप आणि पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांच्या उपस्थितीत निवेदन सादर करत देशाचे महामहिम राष्ट्रपती यांना संबल प्रकरणी योग्य चौकशी करत संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी सादर केलेल्या निवेदनात केली आहे.
यावेळी उपस्थित धर्मगुरू ने संबल प्रकरणी विशिष्ट जातीच्या लोकांना टार्गेट करत असून भारतीय संविधानानुसार जे कोणी दोषी असेल त्या दोषींवर योग्य ती चौकशी करत दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करण्याचे सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आणि 1991 साली अमलात आणलेल्या कायद्याचा काटेकोर पालन करत धार्मिक स्थळ संरक्षक कायदा प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी ही निवेदनात केली आहे
या वेळी मुफ्ती सुलेमान नदवि,मौलाना शाहीद,हाफिझ रिझवान,मौलाना जमील, हाफिझ अब्दुल रहीम, मौली अशफाक,मोहम्मद युसुफ सेठ,मोहम्मद गौस अब्दुल नबी,मुजीब पठाण,अतीख अहेमद, बबलू सेठ, इक्बाल कुरेशी,मोहम्मद हुसैन पीर मोहम्मद,मोहम्मद बुरहन,मजीद अब्दुल हमीद,मोहम्मद माजीद मोहम्मद इस्माईल,मोहम्मद हकीम, मोहम्मद इमरोज सहित शहरातील मुस्लिम युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



