शिक्षण

प्रा. मिलिंद थोरात यांना पीएचडी पदवी जाहीर

 

नांदेड दि.2 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड द्वारा भोगावती महाविद्यालय, कुरूकली, कोल्हापूर येथील इतिहास विभागातील प्रा. मिलिंद थोरात यांना पीएच.‌डी पदवी जाहीर करण्यात आली. त्यांनी “पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे सुधारणा चळवळीतील योगदान : एक ऐतिहासिक अभ्यास” या शीर्षका वर प्रा. डॉ. विजया साखरे श्री शिवाजी कॉलेज, कंधार यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास विषयामध्ये संशोधन कार्य पूर्ण केले. यावेळी आयोजित मौखिक परीक्षेसाठी आर.सी.पी. कला, विज्ञान महाविद्यालय, शिरपूर, धुळे येथील डॉ. रमेश जाधव हे बहि:स्थ परीक्षक म्हणून तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड मानव्यविद्या शाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.पराग खडके हे विद्यापीठ प्रतिनिधी अध्यक्ष म्हणून होते.

त्याचबरोबर स्वा.रा.ती.म. विद्यापीठ, नांदेड इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. राहुल वरवंटीकर हे ही उपस्थित होते.प्रा.मिलिंद थोरात यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे डॉ.वैजनाथ गंदगे,डॉ.मिलिंद बचुटे, पोलीस कर्मचारी शिवराज वाडीकर,श्री.अंकुश कोल्हेवाड,डॉ.सुभाष रगडे, डॉ.संतोष राठोड,डॉ. शिवाजी भागानगरे,प्रा.बबन जोंधळे, प्रा.सिद्धांत खिल्लारे,डॉ. बाबासाहेब भुक्‍तरे,श्री. अविनाश कोलते,प्रा.अक्षय हसेवाड,डॉ.संबोधी रगडे (कानिंदे),श्री.वैभव गंदगे,श्री. रोहन कानिंदे,श्री.शुभम कानिंदे,श्री.यशवंत थोरात यांच्यासह आप्तस्वकीय आणि मित्र मंडळ यांनी अभिनंदन केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *