जिला

अंगण स्वच्छ, सुंदर ठेवणार त्याचा 26 जानेवारीला सत्कार

स्‍वच्‍छ भार‍त मिशन टप्‍पा-2: जिल्‍हयातील ग्रामस्‍थांनी सहभागी होण्‍याचे आवाहन

 

नांदेड,10- ग्रामीण भागातील सर्व गावात दृश्यमान स्वच्छता राहावी, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या कुटुंबांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाकडून जिल्हा व पाणी स्वच्छता मिशन कक्षाकडून स्वच्छ भारत मिशन टप्पा-2 अंतर्गत ‘स्वच्छ माझे अंगण’ अभियान राबविले जात आहे. हे अभियान 1 ते 20 जानेवारीपर्यंत राबविण्यात येत आहे. वर्गीकरण केलेल्या घरगुती कचऱ्याचे घर किंवा घराच्या परिसरात व्यवस्थापन करणाऱ्या कुटुंबाचा 26 जानेवारीच्या ग्रामसभेत प्रशस्तिपत्रक देऊन सन्मान करण्यात येणार आहे. जिल्ह्यात 1310 ग्रामपंचायती असून या सर्व गावांमध्ये स्वच्छता अभियान जनजागृतीसाठी स्वच्छ माझे अंगण अभियान राबविण्यात येत आहे.

घराची शोभा अंगण वाढविते

स्वच्छ, सुंदर, सारवलेले अंगण हे घराची शोभा वाढवत असते. सुंदर रांगोळीही रेखाटली असेल तर सुंदरता आणखी वाढते. अभियानापुरती स्वच्छता न राहता ती कायमस्वरूपी सवय व्हावी. जी गावे आधीच स्वच्छ झाली आहेत, ती स्वच्छच रहावीत. त्यात सातत्य रहावे यासाठी हे अभियान आहे.

परसबाग, शोषखट्टा, स्वच्छतेची पडताळणी करणार

वैयक्तिक शौचालय, सांडपाणी व्यवस्थापनाकरिता शोषखड्डा/परसबाग/पाझरखड्डा, घनकचरा व्यवस्थापनाकरिता कंपोस्ट खतखड्डा अथवा घरगुती खतखड्डा, कुटुंबस्तरावर कचराकुंड्यांची ग्रामपंचायती मार्फत पडताळणी होईल.

अभियान किती दिवस चालणार ?

हे अभियान 20 जानेवारीपर्यंत सुरू राहणार असून 24 तारखेपर्यंत पडताळणी करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व कुटुंबांना 20 जानेवारीपर्यंत आपली तयारी करावी लागणार आहे.

पात्र कुटुंबांचा होणार सत्कार

घरातील स्वच्छता, कचरा कुंड्या, परसबाग, कंपोस्ट खत अशा पद्धतीने स्वच्छतेबाबतचे सर्वाधिक निकष पूर्ण करणाऱ्या अव्वल कुटुंबांचा 26 जानेवारीला सरपंचांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.

 

दृश्‍यमान स्‍वच्‍छतेसाठी कचरामुक्‍त गाव माहिम जिल्‍हा परिषदेने हाती घेतली आहे.  तसेचमार्च अखेर जिल्‍हयातील सर्व बावे हागणदारीमुक्‍त अधिक करावयाची आहेत. त्‍यात राज्‍य शासनाच्‍या वतीने सुरु केलेल्‍या स्‍वच्‍छ माझे अंगण अभियानात आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम या कालावधीत नागरिकांनी अधिक प्रभावीपणे करावे. – नारायण मिसाळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *