ईनामदार मुतवल्ली फेडरेशन (वक्फ) च्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदी शेख गौस यांची निवड.

अर्धापूर:- उध्दव सरोदे / ईनामदार मुतवल्ली सज्जादा अॅन्ड ट्रस्टीज फेडरेशन (वक्फ) महाराष्ट्राच्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदी अर्धापूर येथील दर्गाह असाबे रसूलचे मुतवल्ली शेख गौस शेख हयात यांची नुकतीच फेडरेशनचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा.गौस शौकत शिरोडकर यांनी नुकतीच नियुक्ती केली आहे.
महाराष्ट्र वक्फ फेडरेशनच्या वतीने राज्यभर जिल्हा निहाय नवीन जिल्हा कार्यकारिणी निवडी बाबद दरगाह सय्यद अहमद शेर सवार जालना येथे बैठक पार पडली.या बैठकीत फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष गौस शिरोडकर,सय्यद जमील मौलाना यांनी सांगितले की,फेडरेशन ईनामदार व मुतवल्लींच्या अधिकाराच्या रक्षणासोबत ईनामी जमिनीच्या सुरक्षेसाठी काम करते.संघटनेचा मुख्य उद्देश म्हणजे ईनामी संपत्त्या व वक्फशी संबंधीत संपत्तीचे संरक्षण, प्रबंधन व ईनामदार,मुतवल्ली, सज्जादा यांच्या अधिकाराचे रक्षण करणे आहे.
तसेच दर्गाह,मजार, मकबरा,ईदगाह,इमामबाडा इत्यादी मजहबी क्षेत्राचे संरक्षण करणे ही संघटनेची प्राथमिक जबाबदारी आहे. ही बैठक फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष गौस शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली व जालन्याचे महासचिव सय्यद जमील अहमद रजवी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.या जिल्हाध्यक्ष निवडीच्या बैठकीत शेख गौस यांची नांदेड जिल्हाध्यक्ष पदी निवड करून फेडरेशनच्या विस्तार व वाढीसाठी कायदेशीर मार्गाने सर्व संमतीने काम करण्यासाठी सर्व उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या निवडी बद्दल शेख गौस शेख हयात यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.



