जिला

पोलीस अंमलदार श्री राहुल अशोक शिंदे यांच्या उत्कृष्ट कामगीरी बाबत मा.श्री अबिनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी बक्षीस देवुन केला सन्मान

 

पोलीस अंमलदार श्री राहुल अशोक शिंदे, ने. दंगा नियंत्रण पथक (RCP) पोलीस मुख्यालय नांदेड हे फोर्स वनचे प्रशिक्षण कामी पुणे येथे गेले होते. त्यांनी दिनांक 04.11.2024 ते दिनांक 28.12.2024 या कालावधीत फोर्स वन ट्रेनींग पुणे जीसीपीसी सत्र क्रमांक 73 मध्ये सहभाग घेतला होता. सदर कोर्समधील अंतिम फायरिंग परिक्षामध्ये दंगा नियंत्रण पथक येथे नेमणुकीस असलेले पोलीस अंमलदार श्री राहुल अशोक शिंदे यांनी भाग घेवुन त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला असुन त्यामुळे नांदेड पोलीस दलांचे नाव उंचावले आहे. सदर कोर्समध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगीरी केली आहे.

त्यांनी केलेली ही उत्कृष्ट कामगीरी पोलीस दलाचे नावलौकीक वाढवणारे आहे. त्यामुळे मा. श्री अबिनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी बक्षीस व फोर्स वनचे प्रमाणपत्र देवुन सन्मान केला आहे.

मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, मा. श्री सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, मा. डॉ. अश्विीनी जगताप, गृह पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री विजय धोंडगे, राखीव पोलीस निरीक्षक, मा. श्री. मधुकर चौदंते, राखीव पोलीस उप-निरीक्षक पोलीस मुख्यालय नांदेड यांनी त्यांचे उत्कृष्ट कामगीरी बदल कौतुक करून अभिनंदन केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *