जिला

रस्त्यावरचे 34 टक्के मृत्यू हेल्मेट न घातल्यामुळे

• रस्ता सुरक्षा सप्ताहामध्ये हेल्मेट, सीटबेल्ट वापरा मोबाईल पासून सावध रहा

नांदेड दि. 16 जानेवारी : रस्त्यावर होणाऱ्या अपघातामध्ये 34 टक्के मृत्यू हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही कायद्याची कडक अंमलबजावणी होण्यापूर्वीच स्वसुरक्षा म्हणून हेल्मेटचा वापर करावा. सीट बेल्ट वापरावा. वाहन चालवतांना भ्रमणध्वनीचा उपयोग करणे टाळावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
एका वर्षामध्ये फक्त नांदेड सारख्या छोट्या जिल्ह्यात 350 वर नागरिकांचा अपघातात मृत्यू होतो.

एखाद्या महामारीप्रमाणे हा आकडा आहे. त्यामुळे प्रत्येक वाहनधारक एकदा वाहन चालवायला लागला की अपघाताच्या धोक्यामध्ये आला हे निश्चित असते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक आहेत. त्यामुळे या रस्ता सुरक्षा सप्ताहामध्ये सर्व नागरिकांनी हेल्मेट वापरणे, सीटबेल्ट वापरणे, मोबाईल न वापरणे, दारू पिऊन वाहन न चालविणे, ओव्हरस्पिड टाळणे, आपल्या वाहनांना प्रखर प्रकाश असणाऱ्या एलईडी लाईट न वापरणे यासंदर्भात काळजी घेण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *