जिला

मतदान कार्ड परत करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर दिव्यांग बांधव बहिष्कार टाकणार : राहुल साळवे

 

नांदेड प्रतिनिधी: स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्वराज्य संस्था कडील दिव्यांगांचे राखीव 5 टक्के निधी दिव्यांगांना वेळेवर मिळत नाही, यासाठी लोकशाही मार्गाने निवेदन देऊन आंदोलने उपोषणे करून मोर्चे काढावी लागतात तरी सुद्धा तो निधी खर्च केला जात नाही, यासह राज्य सरकार सुद्धा दिव्यांगाच्या हिताचे निर्णय घेत नाही, चार-चार महिने त्यांचं निराधार मानधन मिळत नाही,

आमदार खासदार त्यांच्याकडील दिव्यांगांचा राखीव शासन निर्णयीत निधी खर्च करत नाही मग आम्ही आजवर भरभरून मतदान करून तरी आमचा काय फायदा त्यामुळे बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीतीच्या वतीने स्थानिक/नागरी स्वराज्य संस्थेवर बहिष्कार टाकून २५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनीच आप आपले मतदान ओळखपत्र जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्फत भारत निवडणूक आयोगाकडे परत करण्यात येणार असल्याचे बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी आज एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *