क्राईम

कुंडलवाडी पोलीस ठाण्यात लाच लुचपत विभागाची मोठी कारवाई

दोन अधिकाऱ्यांना १७ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

 

कुंडलवाडी- (अनंतोजी कालिदास ) शासकीय वाळू डेपो वरून वाळू वाहतुकीचा हायवा कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कोणतीही कारवाई न करता चालू देण्यासाठी १७००० रुपयांची लाच घेताना कुंडलवाडी पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई दि.२३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास केली आहे.या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार तक्रारदाराकडे एक हायवा असुन ते शासकीय वाळू डेपोवरून कायदेशीर परवानगी असलेल्या ऑर्डर मिळाल्याप्रमाणे वाळू वाहतूक करतात. वाळू वाहतुकीचा हायवा कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वाळू वाहतूक करताना त्यावर कोणतीही पोलीस कारवाई करण्यात येऊ नये यासाठी कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे व पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांनी तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांची मागणी केली होती.

तक्रारदारांना २५ हजार रुपयांची मागणी ही लाच असल्याची खात्री पटल्यामुळे त्यांनी नांदेड येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली.यानंतर दि.२३ जानेवारी रोजी कुंडलवाडी पोलीस ठाण्यातच सापळा रचण्यात आला होता.यात २५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती व तडजोडी १७ हजार रुपये पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांनी सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांच्या समक्ष स्वीकारले.

आरोपी सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे व पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले असून कुंडलवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत विभाग नांदेडचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संजय तुंगार,पोलीस उपाधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रीती जाधव,पोलीस कर्मचारी राजेश राठोड,बालाजी मेकाले, ईश्वर जाधव आदींनी केली आहे. एकाच वेळी पोलीस दलातील दोन अधिकाऱ्यांना लाचलुचपत विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *