स्पोर्ट्स

जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत समशेरसिंग पारधी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे यश

 

किनवट दि.२३ नांदेड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत समशेरसिंग पारधी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पाटोदाने उपविजेतेपद मिळवून यश संपादन केले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत यजमान असलेल्या नांदेड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने त्याचा फायदा घेत विजेतेपद मिळवले पण ग्रामीण डोंगरी भागातून कोणत्याही भौतिक सुविधा नसताना देखील जिल्हास्तरावर उपविजेतेपद मिळवल्याबद्दल समशेरसिंग पारधी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या खेळाडूंनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.

त्यांनी आपल्या खेळाद्वारे सर्वांची मने जिंकली या संघामध्ये गोपाळ शेळके (कर्णधार), निशांत टिंगनवार, आदित्य पलीकोंडावार, भागवत डुकरे, आदित्य कोवे,नामदेव भुरके, साहील कोतवाल, परमेश्वर झिंगरे यांचा समावेश होता. या संघास गट निदेशक विजय कांबळे यांनी मार्गदर्शन केले तर सहाय्य म्हणून शिल्प निदेशक एस.एस.पेंढारकर हे होते.

जिल्हास्तरावर मिळवलेल्या या उपविजेत्या संघाचे डी.इ.ओ. श्री. आर.व्ही. गणवीर साहेब,पाटोदा आयटीआयचे प्रभारी प्राचार्य एस. एस.परघणे,नांदेड आयटीआय चे प्राचार्य श्री.सूर्यवंशी साहेब,किनवट आयटीआय चे गट निदेशक देशपांडे साहेब,सहाय्यक अधिव्याख्याता शहाणे एच. जी.,शिल्प निदेशक एस.एस. भटकर,शिल्प निदेशक वैशाली खोकले,लिपिक एस.एस.राऊत,भांडारपाल व्ही.पी.हजारे,गौसुद्दीन पठाण आदींनी अभिनंदन केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *