जिला

महिलांना आर्थिक स्‍वावलंबनाची संधी: बचत गटांच्‍या वस्‍तू मॉल व सुपर मार्केटमध्‍ये

 

नांदेड, 28- नांदेड जिल्ह्यात ग्रामीण महिलांच्या बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना स्थिर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल व जिल्हा अभियान संचालक डॉ. संजय तुबाकले यांच्या संकल्पनेतून नांदेड येथे विशेष विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, स्थानिक व्यापारी, दुकानदार, मॉल व सुपर मार्केट, यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने जिल्ह्यातील 6 तालुक्यांमध्ये बचत गटांच्या वस्तूंना विक्रीची संधी मिळाली आहे.

देगलूर तालुक्यातील लक्ष्मी बचत गटाचे मसाले मुंबईतील न्यू बॉम्बे एक्स्पोर्ट आणि विकास राजदूत हॉटेल यांच्यासोबत विक्री करार झाला आहे. भोकर येथील वासवी सुपर मार्केटमध्ये मीराबाई बचत गटाच्या आवळा कॅन्डी, लोणचे आणि मुरंबा यांची विक्री सुरू झाली आहे. नायगाव येथील महालक्ष्मी गटाच्या घोंगडीला नांदेडच्या किसान मॉलमध्ये विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. हिमायतनगरमधील पळशीकर सुपर शॉपमध्ये फातिमाबी गटाच्या भेसळमुक्त डाळी आणि अर्धापूर येथील संत सावता गटाची हळद बळीराजा शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक ग्राहकांना दर्जेदार आणि शुद्ध उत्पादनांची खरेदी करता येत आहे.

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रधानमंत्री लखपती दीदी कार्यक्रमाला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळत असून, ग्रामीण महिलांसाठी शाश्वत उपजीविकेचे मार्ग खुले होत आहेत. ग्रामीण भागातील महिलांच्या उद्योजकतेला मिळणारे हे प्रोत्साहन ही यशस्वी परिवर्तनाची नांदी आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी म्‍हटले आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये बचत गटांच्या वस्तू विक्रीसाठी पुढील प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *