धर्माबाद येथील एंजल्स एज्युकेशन शाळेत ७६ वा प्रजासत्ताक दिना निमित्ताने उत्साहात साजरा
नुसरत कन्स्ट्रक्शन चे मालक मोईजोदिन सेठ यांनी शाळेला 51,000 चा निधी देऊन शाळेच्या प्रगतीसाठी मोठे योगदान दिले


धर्माबाद. (मोहम्मद हकीम) धर्माबाद तालुक्यातील एंजल्स एज्युकेशन स्कूलच्या वतीने THR फंक्शन हॉल येथे वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रजासत्ताक दिना निमित्ताने करण्यात आले. हा कार्यक्रम अप्रतिम आणि यशस्वी झाला विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर सादरीकरण केले, इंग्रजी, मराठी, उर्दू, हिंदी अशा प्रत्येक भाषेत भाषणे दिली, राज्यघटनेची मूळ उद्दिष्टे, सामाजिक भान, मुलांचे योग्य संगोपन, अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर त्यांची भाषणे आणि त्यांची नाटके कविता, भाषणे, आत्मविश्वास तसेच विज्ञान प्रकल्पांनी सर्वांची मने जिंकली,या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कन्स्ट्रक्शन चे मालक मोईजोदिन सेठ लाभलेलदिले ेत. या कार्यक्रमातील विज्ञान प्रकल्प शाळेचे मुख्याध्यापक शेख मुखित सर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आले असून शाळेतील इतर वाजीद सर, तन्वीर मौलाना, अयुब मौलाना व एहतेशाम सर आणि सर्व शिक्षकांचे मोलाचे योगदान व मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. सर्वांनी कौतुक केले.
व शेवटी विद्यार्थ्याना त्यांच्या क्रीडा, विज्ञान प्रकल्प व कामगिरीनुसार शहरातील मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नुसरत कन्स्ट्रक्शन चे मालक मोईजोदिन सेठ करखेलीकर, यांनी शाळेला ₹ 51,000 चा निधी देऊन शाळेच्या प्रगतीसाठी मोठे योगदान दिले व इतरांनी सुद्धा मुलांचे कौतुक केले आणि रोख बक्षिसे देऊन प्रोत्साहन दिले आहेत.
आदरणीय पाहुणे म्हणून मौलाना अहद साहब, हाफेज अ.गफ्फार साहब, मौलाना अंसार बेग सहाब, मौलाना फौजान, हाफीज कैसर, हाफीज सोहेल, व सर्व उलेमा उपस्थित होते, आणि विशेष पाहुणे म्हणून अ.गफ्फार साहब सरपंच, युनुस खान साहब, समीर अहमद साहब, आबेद अली साहब, अमीरुद्दिन सेठ, इक्बाल सेठ, हाजी अल्ताफ साहब, खुद्दूस सेठ THR, जावेद भाई करखेलीकर, बाबू भाई करखेलिकर, शफीक भाई, मुबाशिर लाला, आरिफ भाई, आवेज़ अली भाई,सय्यद ईलियास दैनिक कळंब नगरी चे जिल्हा प्रतिनिधी,मिन्हाज पटेल अत्थर भाई पटेल, अमान खान, मस्तान कुरेशी, मसूद भाई, नदीम भाई, शेख सद्दाम, इद्रिस पटेल, आणि नांदेड येथील खास कार्येक्रम साठी आलेले झाकीर खान सर, व तसेच अनेक जण व पालक उपस्थित होते.
सरतेशेवटी, अनेक आनंदी चेहऱ्यांनी, मुलांचे कौतुक आणि टाळ्यांच्या कडकडाटाने कार्यक्रम रंगला.
एखाद्या उद्देशासाठी काळजीपूर्वक आणि समर्पित वृत्तीने केलेले प्रयत्न आणि परिश्रम निश्चितपणे यशस्वी होतात.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचे, आणि आपला अमूल्य वेळ देणाऱ्या पालकांचे नवीद अहमद यांनी विशेष आभार मानले व तसेच एंजल्स एज्युकेशन स्कूलचे व्यवस्थापन आरिफ मोहम्मद, नवीद अहमद, ए.वासे, आणि कर्मचारी मनापासून आभार मानले



