मराठवाडा

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यातील आपदग्रस्तांना मदतीचा हात

 

परभणी,दि.31(प्रतिनिधी) : परभणी वन विभागातील वन विभागाच्या प्राण्यांच्या हल्ल्यात जिवित हानी व गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींसह त्यांच्या कुटूंबियांना शासनाकडून मदतीचा हात देण्यात आला. सेलू तालुक्यातील निपाणी टाकळी येथील मोतीराम रंगनाथ गिराम हे गृहस्थ रान डुकराच्या हल्ल्यात मृत्यू पावले होते. त्यांचे वारस रामप्रसाद मोतीराम गिराम यांना वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाद्वारे 25 लाख रुपयांचे अर्थसहाय्याचा धनादेश प्रदान करण्यात आला.

तर रानडुकाराच्या हल्ल्यातच गंभीर जखमी झालेल्या कात्नेश्‍वर येथील दिगंबर मारोती हेंडगे यांना 5 लाख रुपयांचा तसेच परभणी तालुक्यातील पोरवड येथील श्रीमती द्वारकाबाई दिगंबर तिडके यांना रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याबद्दल 5 लाख रुपयांचा धनादेश जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघना साकोरे बोर्डीकर यांच्याहस्ते शुक्रवार 31 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रदान करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, विभागीय वन अधिकारी राजेंद्र नाळे, सहाय्यक वनसंरक्षक गंगाधर ढगे, वन परिक्षेत्र अधिकारी आर.आर. चव्हाण, वनपाल ए.आर. आयनिळे, वनपाल के.एम. थोरे, वनरक्षक श्रीमती शेख निलोफर शेख सत्तार हे उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *