पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाची हिंगोली मध्ये गुटख्याविरुद्ध धडक कारवाई औंढा नागनाथ येथे 4 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी आपल्याकडील अधिकारी व अंमलदारांचे एक पथक हिंगोली जिल्हयात रवाना केले होते.
सदर पथकाने, दिनांक 05.10.2026 रोजी, पोलीस ठाणे औंढा नागनाथ हद्दीतील खातीव कॉलनी, हिंगोली रोड येथील वाहवोद्दीन खमरोद्दीन खतीब यांचे राहते घरामध्ये छापा टाकून, 4 लाख 34 हजार 996 रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहेत.
औंढा नागानाथ पोलीस ठाणे हद्दीत खातीव कॉलनी येथे प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाची अवैध साठवणूक व विक्री होत असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी कारवाई केली असून, या कारवाईत गुटख्यासह, राज निवास पान मसाला, गोवा, आरएमडी, विमल. सुगंधित जर्दा व जाफरानी जर्दा इत्यादी प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाचा समावेश आहे.
या प्रकरणात, औंढा नागनाथ भागात राहणारे वाहबोहीन खमरोहीन खतीव, रा. खातीव कॉलनी, हिंगोली रोड, औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली याच्याविरुद्ध पोलीस ठाणे औंढा नागनाथ गुरनं 992/2026 कलम 123, 233, 274, 275, भारतीय न्याय संहिता सह कलम 26 (2) (iv). 27 (3) (e), 27 (3) (d), 30 (2) (a), 59 अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम, 2006 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाईत, पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांचेसह पोहेका / प्रदिप खानसोळे, पोहेका / गणेश राठोड पोहेका / संदिप वाघाडे व पोहेका / गजानन डवरे यांनी सहभाग घेतला. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहित केले आहे.
‘खबर हेल्पलाइन वरुन माहिती द्या अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलीसांना पोहोचविता यावी, या दृष्टिकोनातून, पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली ‘खबर’ नावाची हेल्पलाइन सुरू केली असून, सदर हेल्पलाइन वरून नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयापर्यंत पोहचवावी, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे.



