स्पोर्ट्स

वृषाली पाटील जोगदंड गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, तर मार्तंड चेरले, सृष्टी जोगदंड व तेजबिरसिंघ जागीरदार गुणवंत खेळाडू पुरस्काराने सन्मानित ….

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड च्या वतीने प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री नामदार अतुल सावे यांच्या हस्ते देण्यात आलेल्या पुरस्कारात नांदेड जिल्हा धनुर्वीद्या संघटनेच्या सचिव तथा मुख्य प्रशिक्षिका वृषाली पाटील जोगदंड यांना 2023 -24 चा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्यात आला . तर खेळाडूंमधून सृष्टी बालाजी पाटील जोगदंड , मार्तंड बालाजी चेरले , तेजवीरसिंग चरण कमलजीत सिंग जहागीरदार यांना गुणवंत खेळाडू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर प्रजासत्ताक दिनी विविध पुरस्काराचे वितरण क्रीडा विभागाच्या वतीने करण्यात आले त्यामध्ये खेळाडूंनी मागील पाच वर्षात केलेल्या कार्याचा गौरव म्हणून स्मृतीचिन्ह ,रोख रक्कम दहा हजार व सन्मानपत्र पालकमंत्री माननीय नामदार अतुल सावे यांच्या हस्ते नांदेड जिल्ह्यात धनुर्विद्या खेळात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय गटातील पदक विजेते घडविणाऱ्या क्रीडा मार्गदर्शक वृषाली बालाजी पाटील जोगदंड यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्यात आला.

तर गुणवंत खेळाडू म्हणून सृष्टी बालाजी पाटील जोगदंड , मार्तंड बालाजी चेरले , तेजबिरसिग चरणकमलजीत सिंग जहागीरदार यांना खेळाडू म्हणून पालकमंत्री अतुल साहेब यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला .याप्रसंगी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण खासदार डॉ . अजित गोपछडे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत पोलीस अधीक्षक अविनाश कुमार जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंबरे मुख्याधिकारी मीनल करणवाल यांची प्रमुख उपस्थिती होती .

धनुर्विद्या खेळात सर्वोत्तम कामगिरी बद्दल हे पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे डॉ . हंसराज वैद्य ,ज्ञानोबा नरवाडे , प्रलोभ कुलकर्णी ,शिवाजी गावंडे , डबल शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे राष्ट्रपाल नरवाडे अभय देशमुख अविनाश बारगजे ज्ञानोबा जोगदंड डॉ . शितल भालके राजश्रीताई पाटील उदय डोंगरे ,नितीन वाघमारे ,ज्ञानेश्वर स सुनेगावकर , प्रवीण सावंत ,प्रकाश चितळकर ,धोंडीबा मणसंकरगेकर , कुमार कुर्तडीकर ,लक्ष्मण फुलारी ,जयपाल रेड्डी , यशवंत बोडके ,शिवाजी इंगोले ,सतीश पाटील जाधव शिवछत्रपती पुरस्कार विजेचे जनार्दन गोपिले श्रीनिवास भुसेवार पंडित कदम ,विनोद गोस्वामी ,विजय जिंदाल ॲड. सुनील पोळकर ,ॲड आनंद जोगदंड संजय बेत्तीवर बालाजी शिरशीकर बालाजी चेरले तानाजी चेरले संजय चव्हाण संतोष कनकावार चंद्रप्रकाश होनवडजकर शिवकांत देशमुख ज्ञानेश्वर सोनसळे , मालू कांबळे , कपील पवार यांच्यासह अनेकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत .

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *